Internet Interesting Facts : संपूर्ण जगात इंटरनेटचा मालक कोण, कुठून सुरू होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Worldwide Internet Owner : पडद्यामागे केबल्स, कंपन्या, डेटा सेंटर्स आणि नियमांची एक विशाल जागतिक पुरवठा साखळी आहे. यात सगळ्यात टॉपला कोण आहे, म्हणजे इंटरनेटचा खरा मालक कोण आहे ते पाहुयात.
advertisement
advertisement
या मालकी हक्कातील टप्प्यात सगळ्यात वरच्या स्थानी नेटवर्क प्रोव्हायडर आहे. या कंपन्या समुद्राखाली मोठ्या फायबर-ऑप्टिक केबल्स टाकून खंडांना जोडतात. या कंपन्या मध्यस्थांना पैसे न देता एकमेकांशी थेट ट्रॅफिकची देवाणघेवाण करतात. यात टाटा कम्युनिकेशन्स, गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन यांचा समावेश आहे.
advertisement
advertisement
advertisement
इंटरनेटचा उगम पाणबुडी फायबर-ऑप्टिक केबल्सपासून होतो, ज्यांच्याकडून जागतिक डेटा ट्रॅफिकचा अंदाजे 99% भाग वाहून नेला जातो. हे केबल्स खंडांना जोडतात आणि किनारी लँडिंग स्टेशनवर संपतात. भारतातील प्रमुख लँडिंग पॉइंट्स मुंबई, चेन्नई आणि कोची इथं आहेत. समुद्रात एक केबल तुटल्यास अनेक देशांमध्ये इंटरनेट खंडित होऊ शकतो.
advertisement










