Cocktail Vs Mocktail : कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये नेमका फरक काय? पिण्यापुर्वी माहित असावे 'हे' नियम..

Last Updated:
Difference between cocktail and mocktail : कॉकटेल आणि मॉकटेल हे शब्द आजकाल पार्टी, हॉटेल, कॅफे किंवा सेलिब्रेशनमध्ये हमखास ऐकायला मिळतात. दिसायला रंगीबेरंगी, आकर्षक ग्लासमध्ये सर्व्ह होणाऱ्या या ड्रिंक्स अनेकदा एकसारख्या वाटतात. मात्र नाव जरी मिळतेजुळते असले तरी कॉकटेल आणि मॉकटेल यामध्ये मोठा फरक आहे. अनेकांना यातील नेमका फरक माहिती नसतो. त्यामुळे आज आपण कॉकटेल आणि मॉकटेल म्हणजे काय, त्यामधील फरक आणि त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
1/9
खरं तर कॉकटेल आणि मॉकटेल दोन्हीही वेगवेगळ्या ड्रिंक्स एकत्र मिसळून तयार केल्या जातात. मात्र, दोन्हींची रचना, घटक आणि नियम वेगवेगळे असतात. काही लोकांना वाटते की फरक फक्त नावाचा आहे, पण प्रत्यक्षात या दोन ड्रिंक्सचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे.

advertisement
2/9
कॉकटेल म्हणजे अशी ड्रिंक, ज्यामध्ये अल्कोहोल असते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बिअर, व्हिस्की, वोडका, रम, वाइन यांसारख्या अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये फळांचे रस, सोडा, टॉनिक वॉटर किंवा सिरप मिसळून जी ड्रिंक तयार केली जाते, तिला कॉकटेल म्हणतात. त्यामुळे कॉकटेल हे नेहमी अल्कोहोलयुक्त पेय असते.

3/9
कॉकटेल बनवताना एक ठराविक पद्धत पाळली जाते. कोणत्या प्रकारचे अल्कोहोल किती प्रमाणात वापरायचे, त्यासोबत कोणते फ्लेवर किंवा मिक्सर घालायचे, हे सगळे आधीच निश्चित असते. कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण संतुलित ठेवणे फार महत्त्वाचे असते, त्यामुळे ही ड्रिंक अगदी मोजून-मापून तयार केली जाते.

4/9
कॉकटेलमध्ये अल्कोहोल असल्यामुळे त्यावर काही नियम आणि बंधनेही असतात. उदा. ठराविक वयापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कॉकटेल दिले जात नाही. तसेच काही ठिकाणी कॉकटेल सर्व्ह करण्यासाठी परवानगी किंवा लायसन्सची गरज असते.

5/9
मॉकटेल मात्र कॉकटेलपेक्षा पूर्णपणे वेगळी ड्रिंक आहे. मॉकटेलमध्ये कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल नसते. फळांचे रस, सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, सिरप, पुदिना, लिंबू अशा नॉन-अल्कोहोलिक घटकांपासून मॉकटेल तयार केले जाते. त्यामुळे ही ड्रिंक सर्व वयोगटांसाठी सुरक्षित मानली जाते.

6/9
मॉकटेल तयार करताना फारसे कठोर नियम नसतात. चव, रंग आणि सादरीकरण यावर जास्त भर दिला जातो. आपल्या आवडीनुसार घटक मिसळून मॉकटेल बनवता येते. त्यामुळे मॉकटेलमध्ये प्रयोग करण्याची मोकळीक जास्त असते आणि ती चवीला हलकी आणि फ्रेश असते.

7/9
मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसल्यामुळे ते सर्व्ह करण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. लहान मुले, गरोदर महिला किंवा अल्कोहोल टाळणारे लोकही मॉकटेल सहजपणे घेऊ शकतात. त्यामुळे पार्टी किंवा कार्यक्रमांमध्ये मॉकटेल हा सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो.

8/9
एकूणच पाहिले तर कॉकटेल आणि मॉकटेल दोन्ही दिसायला आकर्षक असले तरी त्यामधील मुख्य फरक म्हणजे अल्कोहोलची उपस्थिती. कॉकटेल हे अल्कोहोलयुक्त आणि नियमबद्ध असते, तर मॉकटेल हे नॉन-अल्कोहोलिक, हलके आणि सर्वांसाठी योग्य असते. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार योग्य ड्रिंक निवडणे हेच महत्त्वाचे आहे.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल
  • उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

  • मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

View All
advertisement