तरुणीचा प्रेमास नकार, संतापलेल्या तरुणानं केलं असं, CCTV मध्ये सगळं दिसलं..., पुण्यात खळबळ
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: प्रेमास नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पुणे : प्रेमास नकार मिळाल्याने संतापलेल्या तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले. 29 डिसेंबरला रात्री सव्वादोनच्या सुमारास थेट रिक्षा आणि दुचाकींना आग लावली. ही घटना पुण्यातील रहाटणी परिसरातील श्रीनगर स्वामी समर्थ कॉलनीत घडली. या आगीत एक रिक्षा आणि चार दुचाकी जळून खाक झाल्या असून सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रेमास नकार दिल्याचा राग मनात धरून तरुणाने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
22 वर्षीय अभिषेक राजाराम श्रीनामे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भगवान अशोक घनाते यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. भगवान घनाते हे रिक्षा चालक असून त्यांनी आपल्या घरासमोर रिक्षा आणि दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांच्या भावांच्या दुचाकीही त्याच ठिकाणी पार्क होत्या. दरम्यान संशयित अभिषेक श्रीनामे यांनी फिर्यादींची रिक्षा, दुचाकी तसेच त्यांच्या भावांच्या दुचाकींना आग लावल्याचा आरोप केला आहे.
advertisement
दुचाकींना आग लावल्यानंतर ही आग स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या सहकार्याने आटोक्यात आणण्यात आली मात्र त्या आगीत चार दुचाकी आणि एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीत सुमारे 3 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला आहे. फुटेजवरून दिसते की संशयित अभिषेक श्रीनामे यांनी वाहने पेटवण्यासाठी पेट्रोलचा वापर केला होता.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
तरुणीचा प्रेमास नकार, संतापलेल्या तरुणानं केलं असं, CCTV मध्ये सगळं दिसलं..., पुण्यात खळबळ










