भाविकांसाठी खूशखबर! सप्तशृंगी मातेचं आता 24 तास दर्शन, त्र्यंबकेश्वर मंदिराचाही मोठा निर्णय
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nashik News: नाताळ आणि वर्षअखेरच्या सुट्टयांत नाशिकमधील सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.
नाशिक : नाताळच्या सुट्ट्या, शाकंभरी नवरात्रोत्सव आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक जिल्ह्यातील शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. ही तुडुंब गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठे बदल केले आहेत. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे.
सप्तश्रृंग गडावर आता 'अहोरात्र' दर्शन
कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान प्रशासनाने मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर मंगळवार, 30 डिसेंबर 2025 ते रविवार, 4 जानेवारी 2026. या पाच दिवसांच्या काळात मंदिर दर्शनासाठी एक क्षणही बंद होणार नाही, ज्यामुळे भाविकांना गर्दीच्या त्रासाशिवाय दर्शन घेता येईल.
advertisement
त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच 'हर हर महादेव'
दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरीच्या तटी, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने द्वार उघडण्याची वेळ एक तास अलीकडे आणली आहे.
नवीन वेळ: आता मंदिर पहाटे 5 ऐवजी पहाटे 4 वाजता उघडणार आहे. पहाटेची वेळ वाढवल्यामुळे सकाळी होणारी भाविकांची गर्दी विभागली जाईल आणि अधिक भाविकांना दर्शन घेता येईल.
advertisement
गर्दीच्या काळात शांतता राखावी, रांगेत उभे राहून शिस्तीचे पालन करावे आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून सर्वांनाच आदिशक्ती आणि महादेवाचे दर्शन सुखकर होईल, असे आवाहन भाविकांना केले जात आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
भाविकांसाठी खूशखबर! सप्तशृंगी मातेचं आता 24 तास दर्शन, त्र्यंबकेश्वर मंदिराचाही मोठा निर्णय










