Astrology: एकच अपत्य असणं शुभ की अशुभ? ग्रहांच्या अशा स्थितीचा होतो परिणाम, ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितलं..

Last Updated:

Astrology: आजच्या काळात अनेक दाम्पत्ये कौटुंबिक नियोजन, सामाजिक परिस्थिती किंवा वैयक्तिक निर्णयामुळे एकाच मुलावर समाधान मानत आहेत. आर्थिक स्थितीनुसार प्रत्येकजण आपल्या आयुष्याचे नियोजन करत असतो. ज्योतिषाचार्य गोपाळ शर्मा यांच्या मते, केवळ एकच अपत्य असणे

News18
News18
मुंबई : 'हम दो हमारा एक' अशी आजकालची परिस्थिती आहे. वाढत्या महागाईने देखील लोक कुटुंब मर्यादित ठेवत आहेत. आजच्या आधुनिक युगात समाज प्रगत झाला असला तरी, अनेक गोष्टींबाबत आपल्याकडे आजही विविध भ्रामक समजुती प्रचलित आहेत. काही ठिकाणी असं मानलं जातं की, एखाद्या दाम्पत्याला केवळ एकच मूल असेल, तर ते अपशकुन मानले जाते किंवा कुटुंबासाठी तो अशुभ संकेत समजला जातो. विशेषतः ग्रामीण भागात अशा चर्चा ऐकायला मिळतात की, कुटुंब पूर्ण करण्यासाठी आणि अशुभता दूर करण्यासाठी लवकरात लवकर दुसरे मूल होणे आवश्यक आहे. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तव याकडे पाहिले असता चित्र वेगळे दिसते.
एकच अपत्य असणे दोष -
आजच्या काळात अनेक दाम्पत्ये कौटुंबिक नियोजन, सामाजिक परिस्थिती किंवा वैयक्तिक निर्णयामुळे एकाच मुलावर समाधान मानत आहेत. आर्थिक स्थितीनुसार प्रत्येकजण आपल्या आयुष्याचे नियोजन करत असतो. ज्योतिषाचार्य गोपाळ शर्मा यांच्या मते, केवळ एकच अपत्य असणे कोणत्याही अर्थाने दोष मानले जात नाही. एक मुलगा किंवा एकच मुलगी असणे हे अधिक दोष निर्माण करते, असे म्हणणे निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्यामुळे जर तुम्हाला एकच संतान असेल तर घाबरून जाण्याचे किंवा दोष लागेल, असे मानण्याचे काहीही कारण नाही.
advertisement
ज्योतिषशास्त्र काय सांगते?
ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला एक अपत्य झाल्यानंतर दुसरे मूल होण्यात अडचणी येत असतील, तर त्याला कुंडलीतील ग्रहांची स्थिती कारणीभूत असू शकते. कुंडलीतील पाचवे स्थान हे संततीचे स्थान मानले जाते. या स्थानी गुरु, केतू किंवा मंगळ यांसारख्या शत्रू ग्रहांची उपस्थिती किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी असल्यास संतान प्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात.
advertisement
जर राहू किंवा केतू पाचव्या भावात असतील, तर त्याला सर्पदोष किंवा पुत्रदोष असेही म्हटले जाते. या दोषामुळे संतान प्राप्तीला उशीर होऊ शकतो किंवा वंध्यत्वासारख्या समस्या जाणवू शकतात. मात्र, अशा ग्रहांच्या स्थितीमुळे एक संतान प्राप्त झाली असेल, तर त्या मुलाला काही हानी होईल किंवा त्यामुळे कुटुंबाला दोष लागेल, असे मानणे पूर्णपणे चुकीचे आहे.
advertisement
ग्रहदोषांवर ज्योतिषशास्त्रीय उपाय -
ज्यांना संतती संबंधित समस्या किंवा ग्रहदोष जाणवत असतील, ते ज्योतिषीय सल्ल्यानुसार काही उपाय करू शकतात: 1. नागदेवतेला दूध किंवा पंचामृताने अभिषेक केल्यास नाग दोषाची तीव्रता कमी होते. 2. काही पवित्र ठिकाणी जाऊन राहू केतू शांती पूजा करणे शुभ मानले जाते. ३. देवी दुर्गा आणि गणरायाची श्रद्धापूर्वक पूजा केल्याने कुंडलीतील अडचणी दूर होतात. 4. नवग्रह मंदिरांमध्ये गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान केल्याने ग्रहांच्या दोषांपासून दिलासा मिळतो. थोडक्यात सांगायचे तर, एकच मूल असणे हा कोणताही अपशकुन नसून तो त्या दाम्पत्याचा निर्णय किंवा ग्रहांच्या स्थितीचा परिणाम असू शकतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Astrology: एकच अपत्य असणं शुभ की अशुभ? ग्रहांच्या अशा स्थितीचा होतो परिणाम, ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितलं..
Next Article
advertisement
Shiv Sena UBT BMC Election:वरळीत बंडाची चाहूल? नाराज आणि उमेदवार दोघांनाही ‘मातोश्री’वर बोलावणं, रात्रीच्या बैठकीत काय झालं?
वरळीत बंडाची चाहूल? नाराज आणि उमेदवार दोघांनाही ‘मातोश्री’वर बोलावणं, रात्रीच्या
  • मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाची समजली जात आहे.

  • दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांमध्ये नाराजीचे वाताव

  • या वादात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप केला असल्याची माहिती

View All
advertisement