ध्यानस्त बसणं पडणं महागात, डोळे उघडल्यावर पश्चातापाची वेळ, ठाण्यातील मठात काय घडलं?

Last Updated:

Thane News: दहा मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले तेव्हा मठातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर त्यांना शेजारी ठेवलीली बॅग दिसली नाही.

ध्यानस्त बसणं पडणं महागात, डोळे उघडल्यावर पश्चातापाची वेळ, ठाण्यातील मठात काय घडलं?
ध्यानस्त बसणं पडणं महागात, डोळे उघडल्यावर पश्चातापाची वेळ, ठाण्यातील मठात काय घडलं?
ठाणे: गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करण्याचे प्रकार तसे नवीन नाहीत. परंतु, ठाण्यातील नौपाडा परिसरात एका मठात धक्कादायक प्रकार घडला. स्वामी समर्थ मठात डोळे मिटून ध्यानस्त बसणं एकाला चांगलंच महागात पडलंय. शेजारी ठेवलेली लॅपटॉपसह महत्त्वाची कागदपत्रे असणारी बॅग लंपास झाली. याप्रकरणी भूषण भानुशाली यांनी पोलिसांत धाव घेतली असून तपास सुरू आहे.
नेमकं घडलं काय?
भूषण भानुशाली हे नेमहीप्राणे सकाळी घरातून पायी निघाले. दहा मिनिटांनी ते नौपाडा, बी केबिन येथील स्वामी समर्थ मठात पोहोचले. त्यानंतर त्यांच्याजवळ असणारी लॅपटॉपसह कागदपत्रांची बॅग त्यांनी शेजारी ठेवली आणि ते ध्यानस्त बसले. दहा मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले तेव्हा मठातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
advertisement
मठातला वीजपुरवठा बंद झाल्यानंतर काही वेळात जनरेटरने वीजपुरवठा सुरू केला. तेव्हा भानुशाली यांना शेजारी ठेवलेली बॅग दिसली नाही. त्यांनी शोध सुरू केला. 20 हजारांचा लॅपटॉप, 200 रुपयांची बॅग, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक डेबिट कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे असा ऐवज त्यांच्या बॅगेत होता. याप्रकरणी भानुशाली यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
ध्यानस्त बसणं पडणं महागात, डोळे उघडल्यावर पश्चातापाची वेळ, ठाण्यातील मठात काय घडलं?
Next Article
advertisement
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल
  • उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

  • मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

View All
advertisement