Pohe Recipe Video : दररोज कांदेपोहे खाऊन कंटाळलात, आता पोह्यांवर बेसन टाकून पाहा

Last Updated:

Pohe Besan Recipe Video : पोहे आणि बेसन हे कॉम्बिनशेही कदाचित तुम्हाला विचित्र वाटलं असेल पण यापासून बनलेला हा स्पेशल पदार्थ. एकदा का तुम्ही बनवाल तर तुम्ही नेहमी बनवाल.

News18
News18
पोहे म्हटलं की सामान्यपणे कांदेपोहे हा ठरलेला पदार्थ. बऱ्याच घरांमध्ये पोह्यांपासून काय बनवायचं तर कांदेपोहे हा नाश्ता ठरलेला असतो. पण दररोज तेच तेच कांदेपोहे खाऊनही कंटाळा येतो. पोह्यांपासून आणखी कोणता पदार्थ बनतो का? असा प्रश्न कित्येकांना पडला असेल. अशाच लोकांसाठी आम्ही पोह्यांचा नवा पदार्थ आणला आहे.
पोहे आणि बेसनचा हा खास पदार्थ. पोहे आणि बेसन हे कॉम्बिनशेही कदाचित तुम्हाला विचित्र वाटलं असेल पण यापासून बनलेला हा स्पेशल पदार्थ. एकदा का तुम्ही बनवाल तर तुम्ही नेहमी बनवाल. आता हा पदार्थ नेमका काय हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. आधी साहित्य पाहुयात.
advertisement
एक वाटी पोहे
एक वाटी बेसन
लाल तिखट
हळद
धने पावडर
चिकन मसाला किंवा मटण मसाला
बारीक चिरलेला कांदा
हिरवी मिरची
टोमॅटो
बारीक चिरलेली शिमला मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
तेल
पांढरे तीळ
बेकिंग सोडा
पाणी
पोहे आणि बेसनचा नवा पदार्थ
एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्या. पाणी काढून टाका. पोहे असेच भिजत ठेवा. आता दुसरं भांडं घ्या, त्यात बेसन पीठ घ्या, एक चमचा लाल तिखट, थोडी हळद, थोडी धने पावडर पाणी घालून मिश्रण बनवून घ्या. एकदम पाणी ओतू नका नाहीतर गुठळ्या होती. थोडं थोडं पाणी घालून एकदम पातळ आणि एकदम घट्टही नाही. मध्यम असं मिश्रण तयार करून घ्या.
advertisement
आता बेसनचं मिश्रण भिजवलेल्या पोह्यांमध्ये घालून चांगले मिक्स करून घ्या. सोबतच पोहे थोडे मॅशही करा. आता यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आता यामध्ये चिकन किंवा मटण मसाला, हळद, चवीनुसार मीठ टाकून चांगलं एकत्र करा. सर्वात शेवटी थोडासा खायचा सोडा आणि थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं.
advertisement
आता गॅसवर अप्पे पात्र ठेवून सगळ्या साच्यात तेल टाकून गरम करून घ्या. त्यात पांढरे तीळ आणि मग तयार केलेलं पोहे-बेसनचं मिश्रण टाका. मिश्रण भरताना आधी कडेने सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी टाकायचं. आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 3-4 मिनिटं वाफवून घ्या. नंतर झाकण काढून वरून तेल सोडून पलटवून घ्या.
advertisement
हे तयार झाले पोह्याचे अप्पे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील, नाश्ताच काय मुलांना टिफिनमध्येही तुम्ही हे देऊ शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Pohe Recipe Video : दररोज कांदेपोहे खाऊन कंटाळलात, आता पोह्यांवर बेसन टाकून पाहा
Next Article
advertisement
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल
  • उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

  • मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

View All
advertisement