KDMC Election: मुंबईनंतर भाजप-शिंदे गटाचं कल्याण-डोंबिवलीत ठरलं, कोण ठरला मोठा भाऊ?

Last Updated:

Kalyan Dombivli Election BJP Shiv Sena : काल रात्री उशिरा मुंबई महापालिकेत भाजप-शिंदे गटाच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतील जागा वाटप अंतिम झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईनंतर भाजप-शिंदे गटाचं कल्याण-डोंबिवलीत ठरलं, कोण ठरला मोठा भाऊ?
मुंबईनंतर भाजप-शिंदे गटाचं कल्याण-डोंबिवलीत ठरलं, कोण ठरला मोठा भाऊ?
मुंबई: महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून मुदत संपण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. महायुती, महाविकास आघाडीमधील जागा वाटपांचा तिढा अजूनही काही ठिकाणी असल्याचे चित्र आहे. काल रात्री उशिरा मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिंदे गटाच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीतील जागा वाटप अंतिम झाल्याची माहिती समोर आली आहे. जागा वाटपाबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले होते. उल्हासनगरमध्ये पडलेल्या ठिणगीची झळ कल्याण-डोबिंवलीतही बसू लागली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे आपल्या होमग्राउंडवर चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपात खेचून आणले. शिंदे गटानेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कल्याण-डोंबिवली, ठाण्यातील या कुरघोडीचे प्रकरण दिल्ली दरबारी पोहचले होते.
advertisement

कल्याण-डोंबिवलीत कोण ठरला मोठा भाऊ?

दोन्ही बाजूने सुरू असलेल्या कुरघोडीमुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानंतर राज्यात महायुतीचे प्रयत्न सुरू झाले. मुंबईनंतर आता कल्याण-डोबिंवलीत जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे. 'सीएनएन न्यूज १८'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट मोठा भाऊ असणार आहे. कडोंमपा मध्ये भाजप ५४ जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना शिंदे गट ६८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
advertisement
भाजपचे कार्यकर्ते स्वबळासाठी आग्रही होते. मात्र, महायुतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्याने शिंदे गटात समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंबईत काय ठरलं?

मुंबईमधल्या 227 जागांपैकी 137 जागांवर भाजप तर 90 जागांवर शिवसेना लढणार आहे. दोन्ही पक्ष त्यांच्या मित्रपक्षांना त्यांच्या कोट्यातून जागा देणार आहेत. एबी फॉर्मचे वाटप करून उद्या दोन्ही पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC Election: मुंबईनंतर भाजप-शिंदे गटाचं कल्याण-डोंबिवलीत ठरलं, कोण ठरला मोठा भाऊ?
Next Article
advertisement
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल
  • उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार

  • विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

  • मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?

View All
advertisement