शाहरुखची ही अभिनेत्री, फक्त एक फिल्म केली आणि 50000 कोटी रुपयांच्या मालकासोबत थाटला संसार
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shah Rukh Khan Actress : शाहरुख खानच्या सिनेमात काम केलेल्या एका अभिनेत्रीने एक फिल्म केल्यानंतर लगेचच 50000 कोटी रुपयांच्या मालकासोबत संसार थाटला होता.
Shah Rukh Khan Actress : शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून तो इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. फक्त सामान्य लोकच नाही, तर मोठमोठे कलाकारही त्याची एक झलक पाहून आनंदी होतात. काही दिवसांपूर्वीच श्रेया घोषालने शाहरुख खानसोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला होता. विशेष म्हणजे ही स्वतः इंडस्ट्रीतील नंबर वन गायिकांपैकी एक आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवणारा प्रत्येक नवीन कलाकार शाहरुख खानसोबत काम करण्याचे स्वप्न पाहतो. शाहरुख खानसोबत काम करणाऱ्या कलाकाराचे नशीब क्षणार्धात बदलते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने शाहरुख खानसोबतच अभिनयाची सुरुवात केली आणि पहिल्याच चित्रपटानंतर मोठ्या पडद्यापासून दूर गेली. पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत रोमॅन्स केल्यानंतर तिने अचानक चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.
कोण आहे ही अभिनेत्री?
बॉलिवूडच्या या अभिनेत्री आपल्या पहिल्याच फिल्ममध्ये हिंदी सिनेसृष्टीतील बादशाहसोबत काम केलं. चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. पण तरीही पहिल्याच चित्रपटानंतर तिने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
गायत्री जोशी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. गायत्री जोशीने 'स्वदेश' या फिल्ममध्ये शाहरुख खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्वदेश’ हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात शाहरुख खानने मोहन भार्गव तर गायत्री जोशी यांनी गीता ही भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटातून गायत्री यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. मात्र, ‘स्वदेश’नंतर गायत्री कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात दिसली नाही. त्यामुळे ‘स्वदेश’ हाच त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.
advertisement
2005 मध्ये केलं लग्न
गायत्री जोशीने 2004 मध्ये ‘स्वदेश’मध्ये काम केल्यानंतर लगेचच 2005 मध्ये लग्न केलं. तिने आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे मालक आणि उद्योजक विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. या दांपत्याला विहान ओबेरॉय आणि युवान ओबेरॉय अशी दोन मुले आहेत. 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या भारतातील 100 सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर (सुमारे 50,000 कोटी रुपये) इतकी असून, ते 50 व्या स्थानावर आहेत.
advertisement
20 वर्षांतही गायत्री जोशी अजिबात बदललेल्या नाहीत
view commentsगायत्री जोशी जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती अनेकदा कार्यक्रमांमध्ये दिसते. त्यामुळे हे स्पष्ट होते की 20 वर्षांनंतरही गायत्री अजिबात बदललेली नाही. आजही ती तेवढीच निरागस, सुंदर आणि गोड दिसते. 2023 मध्ये गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा ते इटलीमध्ये एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले होते. इटलीतील सार्डिनिया येथे 2 ऑक्टोबर रोजी लॅम्बोर्गिनी आणि फेरारी यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने सर्वांनाच धक्का दिला होता. या भीषण दुर्घटनेत दोघेही सुदैवाने बचावले आणि त्यानंतर ते इटलीहून मुंबईला परतले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 10:26 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शाहरुखची ही अभिनेत्री, फक्त एक फिल्म केली आणि 50000 कोटी रुपयांच्या मालकासोबत थाटला संसार











