Jalgaon Gold Silver Price: 8 दिवसांत 27000 रुपयांचा रिटर्न, सोन्या चांदीच्या दरांचा नवा विक्रम, कुठे पोहोचले दर?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जळगाव बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीनेही विक्रमी दर गाठले असून, चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
जळगाव, प्रतिनिधी नितीन नांदुरकर: 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या बाजारात सोन्याने विक्रमी मजल मारल्यानंतर आता चांदीनेही मोठी झेप घेतली आहे. चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, जीएसटीसह (GST) चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८१ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सोन्या चांदीचे दर झपाट्याने वाढत आहेत.
advertisement
दिवाळीतही सोन्या चांदीचे दर वाढणार आहेत. सततच्या दरवाढीमुळे सोनं खरेदी करणं महाग झालं आहे. चांदीच्या दरात ही वाढ अत्यंत वेगाने झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अवघ्या आठ दिवसांमध्ये चांदीच्या भावात तब्बल २७ हजार रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
या वाढत्या दरांमुळे ग्राहक आता चांदी खरेदी करताना आठ दिवसांची मुदत मागत आहेत. विशेष म्हणजे, चांदीची मागणी वाढली असली तरी, मार्केटमध्ये सध्या चांदीचा साठा शिल्लक नाही, असे मत सोने तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
advertisement
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ रेट धोरण आणि अमेरिकन बँकांनी व्याजदर कमी केल्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे मोर्चा वळवला आहे. इंडस्ट्रियल झोन मध्ये चांदीची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
advertisement
चांदीचा उपयोग इलेक्ट्रॉनिक आणि सौर ऊर्जा क्षेत्रासह अनेक उद्योगांमध्ये होत असल्यामुळे दरात मोठी वाढ होत आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचा भाव जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख २७ हजार ४०० रुपये इतका आहे. आता सोन्याच्या पाठोपाठ चांदीनेही विक्रमांचे शिखर गाठल्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
चांदीचे दर डिसेंबरपर्यंत 2 लाख रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त सोनं आताच खरेदी करा. सोनं-चांदीची ETF मध्ये गुंतवणूक वाढली आहे.
advertisement