पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ कारखान्यासह गोपीनाथ गडाची जागाही विकली? शेतकरी नेत्याचा सनसनाटी गौप्यस्फोट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची खासगी कंपनीला विक्री केल्याचे दस्ताऐवज समोर आले आहेत.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची खासगी कंपनीला विक्री केल्याचे दस्ताऐवज समोर आले आहेत. सहकार कायद्याची पायमल्ली, सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही विक्री केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष यामध्ये विक्री केलेली 104 हेक्टर जमीन तिचे बाजार मूल्य याचाही विचार केला नाही. 7000 सभासद, ऊस वाहतूकदार, कर्मचारी, शेतकरी यांची देणी बाकी आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर झाली असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला जातोय.
परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना खाजगी कंपनीला विकल्याने खळबळ उडाली आहेच. अशात आता याच कारखान्याच्या परिसरात असलेले गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक असलेली गोपीनाथ गडाची जागाही विकल्याचा दावा केला जात आहे. कारखाना विकलेल्या रजिस्ट्रीमध्ये याचा उल्लेख करण्यात आल्याने गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक विकल्यात जमा आहे, असा दावा शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी केला आहे. या स्मारकासंदर्भात कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आणि वैजनाथ प्रतिष्ठानच्या दृष्टीने समोर येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ही त्यांनी केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सामग्री, जमिनीसह विक्री झालेली आहे. 104 हेक्टर जमीन विकली आहे. विक्री झालेल्या जमिनीत सर्वे नंबर 92 मध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथ गड आहे. त्यासाठी कारखाना कडून 40 गुठे जमीन कारखान्याने 10 हजार रुपये भाडे तत्त्वावर 99 वर्षांसाठी दिली होती.
advertisement
लीज पेंडन्सीचा सातबारावर बोजा असताना, या खरेदी विक्रीच्या व्यवहारात सातबारा जोडून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुळामध्ये स्मारकाच्या जमिनीचं काय? असा प्रश्न पडला आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झालेला आहे त्याचा नंबरही पडलेला आहे. स्टॅम्प ड्युटी भरून विक्री केलेल्याचे कागदपत्रं समोर आले आहेत. त्यात जर स्मारक असेल तर ते विकल्यात जमा आहे, असं शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
October 13, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ कारखान्यासह गोपीनाथ गडाची जागाही विकली? शेतकरी नेत्याचा सनसनाटी गौप्यस्फोट