Gold : सोन्यातील गुंतवणुकीचे नवे पर्याय काय? 2026 मध्ये कोणते मार्ग आहेत सुरक्षित? वाचा सविस्तर रिपोर्ट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जर तुम्हीही 2026 मध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर दागिन्यांच्या पलीकडे जाऊन या 5 आधुनिक पर्यायांचा विचार नक्की करा.
सोनं... आपल्या भारतीयांसाठी हा केवळ एक धातू नाही, तर तो एक भावनिक ठेवा आहे. सण असो, लग्न असो किंवा अडचणीचा काळ, सोनं नेहमीच आपल्या पाठीशी उभं राहतं. पूर्वीच्या काळी सोनं म्हणजे फक्त दागिने किंवा नाणी खरेदी करणं एवढाच विचार असायचा. पण आता काळ बदलला आहे. आजच्या डिजिटल युगात, सोन्यात गुंतवणूक करण्याचे असे काही 'स्मार्ट' मार्ग आले आहेत, जिथे तुम्हाला चोरीची भीती नाही की घडणावळ (Making charges) देण्याची कटकट.
advertisement
advertisement
1. सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond - SGB)हा सोन्यात गुंतवणुकीचा सर्वात फायदेशीर मार्ग मानला जातो. हे बाँड रिझर्व्ह बँक (RBI) सरकारतर्फे जारी करते.फायदा: सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा तर मिळतोच, पण त्यावर सरकार दरवर्षी 2.5 % निश्चित व्याज सुद्धा देते.विशेष: 8 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर जो नफा मिळतो, त्यावर कोणताही टॅक्स (LTCG) भरावा लागत नाही.कुठून खरेदी कराल? तुम्ही तुमच्या बँक खात्यातून (Net Banking) किंवा पोस्ट ऑफिसमधून हे खरेदी करू शकता.
advertisement
2. गोल्ड ईटीएफ (Gold ETF)जर तुम्हाला शेअर बाजारात रस असेल, तर गोल्ड ईटीएफ हा उत्तम पर्याय आहे. हे म्युच्युअल फंडासारखे असतात, जे सोन्याच्या किमतीवर आधारित असतात.फायदा: तुम्ही अगदी 1 ग्रॅम सोन्याच्या किमतीचे युनिट्स खरेदी करू शकता. यात 'लवचिकता' जास्त असते, म्हणजे तुम्ही कधीही हे युनिट्स विकून पैसे मिळवू शकता.यासाठी तुमच्याकडे Demat Account असणं आवश्यक आहे.
advertisement
3. डिजिटल गोल्ड (Digital Gold)आजकाल गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) किंवा पेटीएमवर (Paytm) तुम्ही सोनं खरेदी करताना पाहिलं असेल, तेच हे डिजिटल गोल्ड.तुम्ही अगदी 1 रुपयापासून सोनं खरेदी करू शकता. हे सोनं सुरक्षित व्हॉल्टमध्ये (Insured Vaults) साठवलं जातं.जेव्हा तुम्हाला हवं असेल, तेव्हा तुम्ही ते विकू शकता किंवा काही ठराविक ग्रॅम झाल्यावर त्याचे नाणे म्हणून घरपोच डिलिव्हरी घेऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








