राणी मुखर्जीच्या मुलीची बॉलिवूड एंट्री, आदिराही फिल्ममध्ये येणार? अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या मर्दानी 3 मुळे चर्चेत आहे. तिच्या चित्रपटांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कथांमुळेही चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या मुलीबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या.
अभिनेत्री राणी मुखर्जीची मर्दानी 3 फिल्म रिलीज झाली आहे. यादरम्यान तिच्या खासगी आयुष्याबाबत विशेषत: तिची मुलगी अदिराबाबतही काही गोष्टी समोर येत आहेत. राणी मुखर्जी अदिराला लाइमलाइटपासून दूर ठेवते. पण तीसुद्धा फिल्ममध्ये काम करणार का? असा प्रश्न तिला मर्दानी 3 च्या निमित्ताने विचारण्यात आला. तेव्हा राणीने तिच्याबाबत सांगितलं आहे.
advertisement
आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत राणीने सांगितलं की तिची मुलगी अदिरा तायक्वांदो शिकत आहे. राणी म्हणाली, "मला माझी मुलगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत हवी आहे. तायक्वांदो शिकल्याने तिला आत्मविश्वास मिळतो. ती पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत वाटते. आजच्या काळात मुलींनी बलवान आणि स्वावलंबी असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजात बदल तेव्हाच शक्य आहे जेव्हा महिला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. एक आई म्हणून मी माझ्या मुलीला तिच्या आनंद आणि प्रतिष्ठेशी कधीही तडजोड करू नये असे शिकवत आहे"
advertisement
"आयुष्यात आनंद ही सर्वात मोठी प्राथमिकता आहे. मी एक मुलगी, एक बहीण आणि एक आई आहे. या सर्व नात्यांमुळे मला हे शिकवले आहे की जर एखादी व्यक्ती आनंदी असेल तर ती तिच्या सभोवतालच्या लोकांनाही आनंदी ठेवू शकते. माझी मुलगी आदिरा हिलाही हेच हवं आहे. तिने आयुष्यात कोणताही मार्ग निवडला तरी आनंदी राहावे आणि आत्मविश्वासाने पुढे जावं. आदिरा भविष्यात काहीही करण्याचा निर्णय घेईल, मग ते चित्रपट असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो, मी नेहमीच तिच्या पाठीशी असेन आणि तिला पाठिंबा देईन", असं ती म्हणाली.
advertisement
राणीची मुलगी आदिरा आता 10 वर्षांची झाली आहे. त्यावेळीही तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. राणी मुखर्जी बोलत म्हणाली की, "आदिरा आता डबल डिजीटमध्ये आहे. ती दहा वर्षांची आहे. ही एक सुंदर भावना आहे. पण मला तिचं बालपण खूप आठवतं. मी अनेकदा तिचे फोटो घेऊन बसते आणि ते पाहत राहते. हे पाहून आदिराला स्वतः तिच्या बालपणीच्या फोटोंचा हेवा वाटू लागला आहे. ती मला म्हणते, "आई, तू माझ्याकडे असं का पाहत आहेस? मी आता तशी दिसत नाही का?" मी म्हणालो, "नाही, पण मला ती छोटी आदिरा हवी आहे."
advertisement









