advertisement

अजितदादा गेले, पक्षावर कुणाची नजर? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईने का होतोय? Inside Story

Last Updated:

अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्या घाईने शपथ घेत असल्याने याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

News18
News18
राहुल झोरी, प्रतिनिधी मुंबई: अजित पवार यांच्या निधनाला ७२ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अशाप्रकारे त्या घाईने शपथ घेत असल्याने याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुनेत्रा पवारांना शपथविधीची एवढी घाई का झाली? असा सवाल विचारला जात आहे. आता या शपथविधीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

पडद्यामागे नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबात पुन्हा एकदा पक्षाची सूत्रं आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. हाच प्रयत्न रोखण्यासाठी हा तातडीचा शपथविधी सोहळा घेतल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केलं. त्यावेळी ते एकटे पडले होते. ते एकटे एकीकडे आणि संपूर्ण पवार कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती निर्माण झाली होती. पवार कुटुंबातील एकही व्यक्ती अजित पवार यांच्या बाजूने नव्हती.
advertisement
सगळं कुटुंब विरोधात असताना अजित पवार यांनी ज्या परिश्रमाने पक्ष उभा केला. तो सुरक्षित ठेवणं, हे पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी कर्तव्य मानलं. पतीचं काम टिकवणं आणि त्याला या दुःखातही पत्नीने कर्तव्य मानलं. आधी सुनेत्रा पवार यासाठी तयार नव्हत्या. पण तुम्ही असं केलं नाही तर अजित पवार यांचे स्वप्नच अधुरे राहिल, पक्ष हातातून गेला तर अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न अधुरं राहिल, याचे भान राखत त्यांनी जड अंतःकरणाने होकार दिला, अशी अंतर्गत माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
त्यामुळे आधी पक्ष आणि नंतर विलीनीकरणाची चर्चा असा निर्णय अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी घेतला. म्हणूनच आधी शपथविधी घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवारांच्या कुटुंबियांनी घेतला. आता पक्ष सोबत आल्यानंतर त्या विलीनीकरणाची चर्चा पुढे नेतील, अशी माहिती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादा गेले, पक्षावर कुणाची नजर? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईने का होतोय? Inside Story
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement