सर्वसामान्यांसाठी कोणती डिझेल SUV ठरते परवडणारी? खरेदीपूर्वी वाचा हे डिटेल्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Affordable Diesel Cars: तुम्हीही एखाद्या अफॉर्डेबल डिझेल कार खरेदीचा प्लॅन करत असाल तर कोणती गाडी तुमच्यासाठी परवडणारी असेल हे जाणून घेणं खुप गरजेचं आहे. चला याविषयी डिटेल्समध्ये माहिती घेऊया.
भारतीय ग्राहकांमधील एक गट हा डिझेल कार खरेदी करणे पसंत करतो. यामागील कारण म्हणजे गाड्यांचा जास्त टॉर्क, चांगली पॉवर आणि फ्यूल एफिशिएन्सी आहे. तसंच 7-सीटर डिझेल कार अशा लोकांसाठी बेस्ट ठरते, ज्यांना कुटुंबासोबत लांबचा प्रवास करायचा असतो. याच कारणामुळे महिंद्रा आणि टाटा सारख्या कंपन्या अजुनही या सेगमेंटमध्ये मजबुत उभ्या आहेत. चला 7-सीटर डिझेल SUVs विषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
Mahindra Bolero : ही भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि परवडणारी 7-सीटर डिझेल एसयूव्ही आहे. याची सुरुवातीची किंमत जवळपास 9.28 लाख रुपये आहे. यामध्ये 1.5 लिटर mHawk डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. जी 75 बीएचपीची पॉवर आणि 210एनएम टॉर्क निर्माण करते. ही 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येते आणि जवळपास 16 किमी/लिटरचा मायलेज देते.
advertisement
advertisement
Bolero Neo : Bolero Neo क्लासिक बोलेरोचं मॉडर्न व्हर्जन आहे. याची सुरुवातीची किंमत 9.43 लाख रुपये आहे. यामध्येही 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे. मात्र ती 100 बीएचपीची पॉवर आणि 260 एनएम टॉर्क देते. मायलेज जवळपास 17 किमी/लिटर आहे. याची डिझाइन बोलेरोपेक्षा जास्त स्टायलिश आहे आणि यामध्ये LED टेललाइट्स, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि रियर पार्किंग कॅमेरासारखे फीचर्स मिळतात. 7-सीटर लेआउटमध्ये तिसरी रो मुलं किंवा लहान प्रवासासाठी योग्य आहे. ही SUV बोलेरोपेक्षा जास्त कम्पर्टेबल आहे. मात्र ऑफर-रोडवर ती तेवढी सक्षम नाही.
advertisement
Tata Safari : टाटा सफारी ही भारतीय ग्राहकांमध्ये बऱ्याच काळापासून लोकप्रिय एसयूव्ही आहे. तिची सुरुवातीची किंमत ₹14.66 लाख आहे. यात 2.0-लिटर क्रियोटेक डिझेल इंजिन आहे जे 170 बीएचपी आणि 350 एनएम टॉर्क निर्माण करते. मायलेज अंदाजे 16.3 किमी/ली आहे. सफारी 6 आणि 7-सीटर दोन्ही लेआउटमध्ये उपलब्ध आहे. यात व्हेंटिलेटेड सीट्स, 12.3-इंच टचस्क्रीन आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखी फीचर्स आहेत. तिची बोल्ड डिझाइन आणि प्रशस्त तिसरी रांग ही फॅमिली एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक मजबूत स्पर्धक बनवते.
advertisement
Scorpio Classic आणि Scorpio N : स्कॉर्पिओ क्लासिक ही एक जुनी पण तरीही लोकप्रिय एसयूव्ही आहे. तिची सुरुवातीची किंमत ₹13.03 लाख आहे. यात 2.2-लिटर डिझेल इंजिन आहे जे 130 बीएचपी आणि 300 एनएम टॉर्क निर्माण करते. मायलेज अंदाजे 15 किमी/ली आहे. आक्रमक स्वरूप आणि मजबूत सस्पेंशनमुळे ही एसयूव्ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लोकप्रिय आहे.
advertisement
Scorpio N ही तिच्या सेगमेंटमधील एक अधिक आधुनिक एसयूव्ही आहे. तिची सुरुवातीची किंमत ₹13.61 लाख आहे. तिचे 2.2-लिटर डिझेल इंजिन 200 बीएचपी पर्यंत पॉवर देते आणि 14.5 किमी/लीटर इंधन कार्यक्षमता देते. त्यात पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि एडीएएस सारखी फीचर्स आहेत. तिचा 4x4 व्हेरिएंट ऑफ-रोडिंगसाठी उत्कृष्ट आहे आणि प्रीमियम एसयूव्ही लूक पसंत करणाऱ्यांसाठी योग्य आहे.
advertisement
Mahindra XUV700 ला कंपनीची प्रीमियम SUV मानले जाते. याची सुरुवातीची किंमत 14.18 लाख रुपये आहे. यामध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन मिळते. जे 200 बीएचपीची पॉवर देते. मायलेज जवळपास 17 किमी/लिटर आहे. यामध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, लेव्हल - 2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि पॅनोरमिक सनरुफसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. या कारला 6 किंवा 7 सीटर लेआउटमध्ये खरेदी केले जाऊ शकते आणि AWD ऑप्शनही मिळतो. ही एसयूव्ही अशा लोकांसाठी आहे जे टेक्नॉलॉजी आणि लग्जरी फीचर्सला प्रायोरिटी देतात.याशिवाय, तुम्हाला 5-सीटर डिझेल एसयूव्ही हवी असेल तर किआ सोनेट आणि टाटा अल्ट्रोज देखील तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतात.








