advertisement

Shocking News : नालासोपारा हादरलं! पतीकडून पत्नीचा आधी छळ, शेवट इतका भयंकर की प्रत्येकजण संतापेल

Last Updated:

Nalasopara Crime News : नालासोपारा येथे पतीकडून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पत्नीचे सोन्या-चांदीचे दागिने अपहार केल्याचा आरोप असून आचोळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

News18
News18
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील अग्रवालनगरी परिसरात पतीकडून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पतीने पत्नीचे सोन्या-चांदीचे दागिने परवानगीशिवाय घेतल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पतीच्या कृत्याने संपूर्ण परिसर हादरला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. आरोपी आर. पी. मुन्नवर अहमद हा किरकोळ कारणावरून पत्नीला वारंवार शिवीगाळ करत असे. तसेच तो तिला धमकावत शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
घरगुती वादातून आरोपी पतीने पत्नीला मारहाण केल्याचेही समोर आले आहे. सातत्याने होणाऱ्या छळामुळे महिलेचे मानसिक स्वास्थ्य बिघडत होते. याच काळात आरोपीने पत्नीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने तिच्या परवानगीशिवाय घेत अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
दीर्घकाळ चाललेल्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने आचोळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking News : नालासोपारा हादरलं! पतीकडून पत्नीचा आधी छळ, शेवट इतका भयंकर की प्रत्येकजण संतापेल
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement