Devkhel वेबसीरिजवरून वाद! पण देवखेळ म्हणजे नेमकं काय? अंकुश चौधरीनेच सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Devkhel : देवखेळ ही नवीन मराठी वेबसीरिज रिलीज झाली आहे. कोकणातील परंपरेवर आधारित ही वेबसीरिज वादात अडकली आहे. या सीरिजमध्ये जो देवखेळ दाखवण्यात आला आहे, तो नेमका काय? याची माहिती अभिनेता अंकुश चौधरीने दिली आहे.
advertisement
advertisement
अंकुश म्हणाला की, देवखेळ हा कोकणतील शिमग्याच्या निमित्ताने खूप्र प्रसिद्ध खेळ आहे. या दिवसांत सहा सहा महिने अगोदर चाकरमान्यांनी आपल्या गावी जाण्याचा प्लॅन केलेला असतो. हा सण इतका जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा आहे की यासाठी काही चाकरमाण्यांनी तर नोकऱ्या सोडल्या आहेत. यामध्ये एक पालखी फिरवली जाते. त्यामध्ये सगळे आपल्या खांद्यावर घेऊन नाचत असतात, सगळ्यांच्या घरी ती फेरी जाते असंही तो यावेळी म्हणाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील देवताली किनारपट्टीवरील गावावर आधारित देवखेळ एका थरारक रहस्यावर आधारित आहे. दरवर्षी होळी पौर्णिमेच्या रात्री, एखाद्याचा मृत्यू होतो. हे मृत्यू न्यायाचं प्रतीक म्हणून स्थानिक पातळीवर पूजल्या जाणाऱ्या शंकासुर या पौराणिक लोककथा व्यक्तिरेखेनेने दिलेल्या दैवी शिक्षेची कृत्ये आहेत, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. जेव्हा इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे गावात येतो, तेव्हा तो अंधविश्वासाला स्पष्टीकरण म्हणून स्वीकारण्यास नकार देतो. ही काळजीपूर्वक लपवून केलेली हत्या असल्याचं त्याचं मत असतं. त्याचा तपास सुरू करतो.
advertisement








