शनिदेवाची मूर्ती घरात का ठेवू नये? 'तो' एक भयानक शाप, तुमच्या कुटुंबाला करू शकतो उद्ध्वस्त
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात घरामध्ये देवघर असणे आणि त्यात विविध देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, शनिदेव असे एकमेव देव आहेत ज्यांची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये, विशेषतः देवघरात ठेवण्यास सक्त मनाई आहे.
हिंदू धर्मात घरामध्ये देवघर असणे आणि त्यात विविध देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, शनिदेव असे एकमेव देव आहेत ज्यांची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये, विशेषतः देवघरात ठेवण्यास सक्त मनाई आहे. शनिदेवाची पूजा करण्यासाठी नेहमी मंदिराचाच सल्ला दिला जातो. यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून एक पौराणिक शाप आणि ज्योतिषशास्त्रीय कारणे दडलेली आहेत.
advertisement
पत्नीचा भयानक शाप: पौराणिक कथेनुसार, शनिदेव हे भगवान श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते. एकदा ते भक्तीत तल्लीन असताना त्यांची पत्नी त्यांच्याकडे आली. बराच वेळ प्रयत्न करूनही शनिदेवांचे लक्ष विचलित झाले नाही, त्यामुळे त्यांच्या पत्नीने रागाच्या भरात त्यांना शाप दिला की, "आजपासून तुमची नजर ज्याच्यावर पडेल, त्याचे नुकसान होईल आणि त्याचे भविष्य वाईट होईल." याच शापामुळे शनिदेवाची नजर घरात पडू नये म्हणून त्यांची मूर्ती घरात ठेवली जात नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ऊर्जेचा समतोल बिघडतो: घरामध्ये आपण नेहमी शांत आणि प्रसन्न मूर्ती ठेवतो. शनिदेव हे उग्र स्वभावाचे आणि कर्माचे फळ देणारे कठोर देव आहेत. घराच्या शांत वातावरणात त्यांच्या ऊर्जेचा समतोल राखणे कठीण असते, ज्यामुळे घरातील 'वास्तू दोष' वाढू शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







