advertisement

सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड, शपथेपर्यंत पुढची प्रक्रिया काय काय असणार? सगळी माहिती

Last Updated:

शनिवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात गटनेते निवडण्यासाठीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला
मुंबई : पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. छगन भुजबळ यांनी गटनेतेपदाचा ठराव मांडला तर हसन मुश्रीफ, वळसे पाटील, धनंजय मुंडे यांनी ठरावाला अनुमोदन दिले.
नियोजित वेळेनुसार आज दुपारी दोन वाजता विधिमंडळात गटनेते निवडण्यासाठीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नेता निवडीच्या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे, तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सगळेच मंत्री, पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सगळेच आमदार उपस्थित होते. या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
advertisement

शपथेपर्यंत पुढची प्रक्रिया काय काय असणार?

राष्ट्रवादी पक्षाचे निवडक नेते थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार
राष्ट्रवादी पक्षाने गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देणार.
त्यानंतर मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे शिफारस करतील.
मुख्यमंत्री निवासस्थानाहून सुनेत्रा पवार यांच्या नावाचे शिफारस करणारे पत्र राज्यपाल यांना पाठविण्यात येईल.
advertisement
त्यानंतर ५.३० मिनिटांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
ही प्रक्रिया पुढील २ तासात पार पडेल.
त्यानंतर सायंकाळी सुनित्रा पवार यांना कोणते खाते द्यायचे या संदर्भात शासन निर्णय जारी केला जाणार.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड, शपथेपर्यंत पुढची प्रक्रिया काय काय असणार? सगळी माहिती
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement