Indian Railway : मुलांसाठी दिवाळीत फटाके नेताय सावधान! खावी लागेल जेलची हवा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diwali Firecracker In Train : दिवाळी म्हणजे फटाके आलेच. कितीतरी लोक फटाके खरेदी करतात. तुम्हीही स्वतःसाठी किंवा मुलांसाठी फटाके नेत असाल तर सावधान कारण तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. आता दिवाळी म्हणजे फटाके, मग यासाठी तुरुंगवास का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा नियम तुम्हाला माहिती असायलाच हवा.
दिवाळी म्हणजे आपल्या लोकांसोबत साजरा करायचा सण. त्यामुळे स्वतःचं घर आणि कुटुंबापासून दूर राहणारे लोक दिवाळीसाठी घरी जाण्याच्या तयारीत आहे. दिवाळीत घरी जाणं म्हणजे कपडे, मिठाई आणि सोबत फटाके नेणंही आलं.
advertisement
पण तुम्ही घरी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करणार असाल आणि सोबत फटाके नेणार असाल तर मात्र तुम्ही तसं करू शकत नाही. कारण ट्रेनमध्ये फटाके घेऊन जाऊ शकत नाही.
advertisement
रेल्वे नियमांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ट्रेनमध्ये कोणतेही ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. यामध्ये फटाके, स्पार्कलर, रॉकेट, पाऊस किंवा कोणत्याही आतिशबाजीच्या वस्तूंचा समावेश आहे.
advertisement
हे केवळ नियमांचं उल्लंघनच नाही तर शेकडो प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण करू शकते. एक छोटीशी ठिणगी किंवा चूक संपूर्ण ट्रेनला आग लावू शकते.
advertisement