भारतातलं सर्वात मोठं ट्रॅफिक जाम, भुकेनं व्याकूळ झोपही नाही, 96 तास अडकले प्रवासी, अंगावर काटा आणणारे PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अरे बापरे हे काय आहे! भुकेनं व्याकूळ अन् झोपही नाही, 65 किमीपर्यंत लांब वाहनांच्या रांगा, 96 तास अडकले प्रवासी, भीषण परिस्थिती दाखवणारे घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे की गाड्यांना मागेही फिरता येणार नाही. दोन्ही बाजूने अडकल्यासारखं झालं आहे.
अरे बापरे हे काय आहे, थोडं जरी ट्रॅफिक लागलं तरी आपण वैतागतो, इथे तर एक दोन नाही चक्क चार दिवस लोक ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. 96 तास तहान, भुकेनं व्याकूळ आणि झोपही झालेली नाही अशा अवस्थेत लोक अडकले आहेत. भारतातील सर्वात मोठं ट्रॅफिक जाम पाहायला मिळालं आहे. चार दिवस लोक अडकले 30 तासांत फक्त 7 किमी अंतर कापण्यात यश आलं आहे.
advertisement
हे ट्रॅफिक जाम कुठे आणि कशामुळे झालं, तिथे काय परिस्थिती आहे. हे सगळं जाणून घेऊया. या ट्रॅफिकचे फोटो आणि व्हिडीओ तर अंगावर काटा आणणारे आहेत. बिहारमधील रोहतास जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग NH 19 वर गेल्या चार दिवसांपासून ट्रॅफिक जाममुळे लोकांची वाट लागली आहे. वैताग आला तरी या वाहतूक कोंडीतून बाहेर पडू शकत नाही, ना पुढे ना मागे अशी अवस्था गाड्यांची झाली आहे.
advertisement
महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सुमारे ६५ किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक गाड्या चार दिवसांपासून अक्षरशः एकाच ठिकाणी उभ्या आहेत. रस्त्याचे बांधकाम सुरू असलेल्या ६ लेनच्या हेडवर्क्स आणि सर्व्हिस लेनचे पर्यायी मार्ग (डायव्हर्शन) पाण्याखाली गेले आहेत.
advertisement
advertisement
या वाहतूक कोंडीचा थेट फटका रोहतासपासून औरंगाबादपर्यंत बसला आहे. वाहनचालक आणि प्रवाशांचे यामुळे मोठे हाल होत आहेत. प्रवीण सिंह नावाच्या एका ट्रक चालकाने सांगितले की, "गेल्या ३० तासांमध्ये आमचा ट्रक फक्त ७ किलोमीटरच पुढे सरकला आहे." तर संजय सिंह नावाच्या दुसऱ्या चालकाने, "आम्ही दोन दिवसांपासून इथे अडकलो आहोत, भुकेले, तहानलेले आणि थकून गेलो आहोत," असे सांगत आपली व्यथा मांडली.
advertisement
advertisement
advertisement
विशेष म्हणजे, जेव्हा एनएचएआयचे प्रकल्प संचालक रणजीत वर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिला. निर्माणाधीन रस्त्यांवर पाण्याचा निचरा होण्याची अपुरी व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीमचा निकामीपणा आणि वेळेवर दुरुस्ती न करणे, या तांत्रिक चुकांमुळे ही भीषण परिस्थिती ओढवली आहे.