Weather Alert: महाराष्ट्रातून वारं फिरलं अन् सोलापूर, कोल्हापूरसह 3 जिल्ह्यांना घेरलं, गुरुवारी धो धो कोसळणार

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाने उघडीप दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात वेगळंच चित्र असून 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यातून मान्सून परतीसाठी पोषक हवामान होत आहे. आज 9 ऑक्टोबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गुरुवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात बुधवारी पावसाची उघडीप राहिली. यावेळी 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके राहीले. तसेच 3 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाची उघडीप राहिली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. यावेळी 33.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात तुरळख ठिकाणी हलका पाऊस झाला. यावेळी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके राहिले. आज, गुरुवारी जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.

7/7
महाराष्ट्रातून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. आज सोलापूर, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारपासून हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवणार असून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement