पुण्यातील कोंढव्यात दहशतवाद्यांचा अड्डा? मध्यरात्री ATSचं मोठं ऑपरेशन, संशयित ताब्यात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ATS Raid At Pune Kondhava: पुणे शहराच्या कोंढवा परिसरात मध्यरात्री अँटी टेररिस्ट स्कॉड अर्थात एटीएसने मोठं सर्च ऑपरेशन राबवलं आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे शहराच्या कोंढवा परिसरात मध्यरात्री अँटी टेररिस्ट स्कॉड अर्थात एटीएसने मोठं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. एटीएसने पुणे पोलिसांच्या मदतीने कोंढवा परिसरात एकाच वेळी तब्बल १८ ठिकाणी ही शोधमोहीम राबवली. मध्यरात्रीपासून इथं ही कारवाई सुरू आहे. यामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
काही संशयित ताब्यात
सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, कारवाई सुरू असल्याने पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी इतकेच पुष्टी केली आहे की, ही एक संयुक्त शोधमोहीम आहे आणि सर्व सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतरच यासंबंधीचा तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल. खरं तर, पुण्यातील कोंढवा परिसरात यापूर्वी देखील एटीएसने छापेमारी करत अनेकांना अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वीच कोंढवा परिसरातून बंदी असलेल्या एका दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली होती. त्यावेळी देशातील एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले होते.
advertisement
Maharashtra | Multiple enforcement agencies, including Pune Police, are conducting searches in Pune’s Kondhwa area to trace suspects allegedly involved in anti-national activities: Pune City Police
— ANI (@ANI) October 9, 2025
आता पुन्हा त्याच भागात काही संशयित व्यक्ती तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या. त्यामुळे मध्यरात्रीपासून हे सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. आतापर्यंत एटीएसनं नेमकं किती जणांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे काही संशयास्पद गोष्टी आढळल्या का? याची माहिती समोर आली नाही. चौकशीनंतर सर्व माहिती दिली जाईल, असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 9:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील कोंढव्यात दहशतवाद्यांचा अड्डा? मध्यरात्री ATSचं मोठं ऑपरेशन, संशयित ताब्यात