Pune Mumbai Highway : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे'ला मिळणार नवा पर्याय; नेमका कसा आहे प्लॅन?

Last Updated:

Multimodal Corridor Pune To Mumbai : पुणे ते मुंबई प्रवासासाठी शिरूर चाकण तळेगाव कर्जत उरण मल्टिनोडल कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. हा इतक्या किलोमीटर लांबीचा चार लेनचा मार्ग वाहतुकीची समस्या कमी करेल.

News18
News18
पुणे : पुणे ते मुंबई प्रवासासाठी आता एक नवीन आणि मोठा पर्यायी मार्ग तयार होणार आहे. या मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा नवा मार्ग शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–उरण मल्टिनोडल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल.
या प्रकल्पाबाबत महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून पालकमंत्री अजित पवार यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासन स्तरावर या मार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या महामार्गाची लांबी 135 किलोमीटर असणार असून हा चार लेनचा महामार्ग असेल. अंदाजे 12,500 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर होणार आहे.
advertisement
सध्या शिक्रापूर, चाकण, तळेगाव आणि लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रे आहेत. त्यामुळे या भागात वाहतुकीचा मोठा ताण आहे. हा नवा मार्ग तयार झाल्यानंतर पुण्यातील आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक 80 टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच या मार्गामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च दोन्ही कमी होतील.
या महामार्गाचे काम बांधा-वापरा-हस्तांतरित करा  तत्त्वावर करण्यात येणार आहे. म्हणजे हा मार्ग खाजगी कंपनीकडून बांधला जाईल आणि काही वर्षे वापर शुल्क घेऊन नंतर सरकारकडे हस्तांतरित केला जाईल.
advertisement
प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण होईल.
पहिल्या टप्प्यात 60 किलोमीटर लांबीचा भाग पूर्ण केला जाईल.
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 75 किलोमीटर मार्गाचे काम केले जाईल. या प्रकल्पामुळे शिरूर, तळेगाव आणि कर्जत परिसरातील औद्योगिक तसेच कृषी व्यापाराला मोठी चालना मिळेल. तसेच मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना एक नवीन आणि सोपा पर्याय मिळेल.
शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षात भूसंपादनाचे काम पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर दोन ते तीन वर्षांत हा महामार्ग तयार होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Pune Mumbai Highway : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे'ला मिळणार नवा पर्याय; नेमका कसा आहे प्लॅन?
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement