Team India : गंभीरच्या घरी हर्षित राणाला स्पेशल ट्रिटमेंट, डिनर पार्टीला खास एन्ट्री, टीम इंडियाचे खेळाडू बघतच राहिले!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Harshit Rana special Entry in team dinner : भारतीय खेळाडूंसह, सर्व कर्मचारी देखील मुख्य प्रशिक्षकाच्या घरी जेवणासाठी आले होते पण हर्षित राणा न आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. पण...
Gautam Gambhir House Dinner Party : भारत आणि वेस्ट इंडिजमधील पुढील कसोटी सामना दिल्लीत खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाचे सर्व खेळाडू दिल्लीत आले आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे घर दिल्लीत आहे, त्यामुळे गंभीरने दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह संपूर्ण संघ गंभीरच्या घरी जेवणासाठी पोहोचला आहे. पण गंभीरचा लाडका खेळाडू हर्षित राणा टीम इंडियासोबत न दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. पण घडलं भलतंच
हर्षित राणाची स्पेशल एन्ट्री
भारतीय खेळाडूंसह, सर्व कर्मचारी देखील मुख्य प्रशिक्षकाच्या घरी जेवणासाठी आले होते पण हर्षित राणा न आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. पण हर्षित राणाने स्पेशल एन्ट्री मारली. टीम इंडियाचा युवा क्रिकेटर हर्षित राणा हा संघाच्या डिनरसाठी प्रशिक्षक गौतम गंभीरच्या घरी खास कारने एकटाच पोहोचला. टीम डिनरसाठी इतर खेळाडू एकत्र आले असताना, हर्षित राणा मात्र वेगळ्या वाहनाने आल्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
advertisement
पाहा Video
Harshit Rana arrived separately in a special car at coach Gautam Gambhir’s house for the team dinner. pic.twitter.com/ucse2nQL1a
— (@rushiii_12) October 8, 2025
टीम इंडियाच्या खेळाडूंना डिनरला बोलव
गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना हर्षितने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळाली. गौतम गंभीर दिल्लीचा रहिवासी आहे आणि दिल्लीत त्याचं एक आलिशान घर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. त्याआधी त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना डिनरला बोलवलं होतं.
advertisement
दुसरा कसोटी सामना दिल्लीत
दरम्यान, या डिनरच्या निमित्ताने संघातील खेळाडूंमध्ये चांगलं बॉन्डिंग निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. भारताने या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आधीच जिंकला आहे आणि संघ 1-0 ने आघाडीवर आहे.
Location :
Delhi
First Published :
October 09, 2025 8:46 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गंभीरच्या घरी हर्षित राणाला स्पेशल ट्रिटमेंट, डिनर पार्टीला खास एन्ट्री, टीम इंडियाचे खेळाडू बघतच राहिले!