Kalyan Traffic: कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका, खुला होणार सर्वात मोठा पूल, कधी?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Kalyan Traffic: कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. सर्वात मोठा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
कल्याण: गेल्या पाच वर्षांपासून कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला वाहतूक सुधारणा प्रकल्प (सॅटिस) व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. येत्या डिसेंबर ते एप्रिलपर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे कल्याणकरांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
नुकतेच महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सॅटिस प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी हा प्रकल्प गतीने पूर्ण करावा, तांत्रिक अडथळे लवकरात लवकर दूर करावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे हा प्रकल्प येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
कल्याण स्थानकालगत नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. याठिकाणच्या वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी सात वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने रेल्वे स्थानक वाहतूक प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी प्रस्तावित निधी 498 कोटी रुपयांचा असून शासनाचे सहाय्यही मिळाले. 2021 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, प्रकल्पाच्या भूसंपादन, रेल्वेच्या जागा, हॉटेलची बांधकामे हे विषय मार्गी लागण्यासाठी काम बंद ठेवावे लागले. त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला.
advertisement
दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना एकाच ठिकाणी बस थांबा, रिक्षा वाहनतळ, दुचाकी, चारचाकी वाहनतळ, प्रवासी पादचारी मार्गिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. कल्याण शहराच्या बाहेरून येणारी वाहने ही रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, अशा पद्धतीने उड्डाणपुलावरून परस्पर जातील. त्यामुळे कल्याण स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 09, 2025 8:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan Traffic: कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका, खुला होणार सर्वात मोठा पूल, कधी?