यंदा दिवाळी कशी साजरी करायची? कोणत्या दिवशी काय करायचे? A TO Z माहिती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Diwali 2025 : दीपावली म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव, जो अंधारावर प्रकाश, दुःखावर आनंद आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.
दीपावली म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव, जो अंधारावर प्रकाश, दुःखावर आनंद आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या मते, यंदाची दीपावली गोवत्स द्वादशीपासून सुरू होऊन भाऊबीजने समाप्त होईल. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. “ध्वनी आणि वायू प्रदूषण न करता, आनंद स्वतःसाठी आणि इतरांसाठी वाटावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे. चला तर मग, यंदाच्या दिवाळीचे प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि शुभमुहूर्त जाणून घेऊया.
advertisement
शुक्रवार, १७ ऑक्टोबर – गोवत्स द्वादशी (वसुबारस) या दिवशी आश्विन कृष्ण द्वादशी प्रदोषकाळात आल्याने गोवत्स द्वादशी साजरी केली जाईल. गाय आणि वासराचे पूजन करून त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. हा दिवस शेतीप्रधान संस्कृतीतील मातृवत गाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
advertisement
शनिवार, १८ ऑक्टोबर – धनत्रयोदशी (धन्वंतरी पूजन) आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने धनत्रयोदशी या दिवशी साजरी होईल. या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन करून आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करतात. तसेच गरीबांना दीपदान, अन्नदान आणि वस्त्रदान करणे पुण्यकारक मानले जाते. व्यापाऱ्यांनी नवीन वह्या आणण्यासाठी उत्तम चौघड्या अशा आहेत. सकाळी ८.०२ ते ९.२९ (शुभ), दुपारी १२.२३ ते १.५० (चल), १.५१ ते ३.१७ (लाभ) आणि ३.१८ ते ४.४४ (अमृत).
advertisement
रविवार, १९ ऑक्टोबर – दिवाळीचा कोणताही सण नाही. सोमवार, २० ऑक्टोबर – नरक चतुर्दशी आहे. चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी आल्याने या दिवशी नरक चतुर्दशी साजरी होईल. चंद्रोदय पहाटे ५.२० वाजता, तर सूर्योदय सकाळी ६.३५ वाजता आहे. चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. सुगंधी तेल व उटणे वापरून स्नान केल्याने शरीर निरोगी आणि त्वचा तेजस्वी होते.
advertisement
मंगळवार, २१ ऑक्टोबर – लक्ष्मीपूजन (अमावस्या) सायंकाळी ६.११ ते रात्री ८.४० या प्रदोषकाळात लक्ष्मी-कुबेर पूजन करावे. ग्रंथांच्या अनुसार, या वर्षी प्रदोषव्याप्ती योग्य असल्याने लक्ष्मीपूजन अमावास्येच्याच दिवशी म्हणजे मंगळवारी करणे श्रेयस्कर आहे. या दिवशी अभ्यंगस्नान, अलक्ष्मी निःस्सारण आणि झाडू पूजन करावे. घर स्वच्छ करून देवी लक्ष्मीचे स्वागत करावे.
advertisement
बुधवार, २२ ऑक्टोबर – बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यावसायिक कामाचा प्रारंभ किंवा गुंतवणुकीसाठी शुभ वेळ आहे. पती-पत्नी एकमेकांना ओवाळतात आणि भेटवस्तू देतात. सकाळी ६.३६ ते ८.०३ (लाभ), ८.०४ ते ९.३० (अमृत), ११.५७ ते १२.२४ (शुभ), आणि सायं. ४.४५ ते ६.१० (लाभ) या चौघड्यांमध्ये वहीपूजन व वहीलेखनासाठी उत्तम मुहूर्त आहे.
advertisement