IND vs WI 2nd Test : विंडिजविरुद्ध पंजा उघडल्यानंतर कुलदीप यादवने मोडला 68 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kuldeep Yadav equals 68 years old records : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कुलदीप यादव याने पाच विकेट्स घेतल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये त्याला कधी संधी मिळत नाही, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संधीचं सोनं करतो. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून कुलदीप यादव आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने कमाल केली.
advertisement
9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, वॉर्डलने 28 कसोटी खेळल्या आणि एका डावात पाच विकेट्स घेतल्या. कुलदीपने त्याच्या 15 व्या कसोटी सामन्यात पाचव्यांदा ही कामगिरी केली.
advertisement
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात कुलदीपने पहिल्या डावात 26.5 ओव्हर टाकले आणि वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना 82 धावा देऊन बाद केलं.
advertisement
या 5 विकेट्सच्या मदतीने कानपूरच्या कुलदीपने इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज जॉनी वॉर्डल यांच्या डाव्या हाताच्या मनगटाच्या फिरकी गोलंदाजाने कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
advertisement
1957 रोजी डर्बन येथे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील रेड बॉल सामन्यात वॉर्डलने कसोटीतील पाचवं पाच बळी घेतले. कुलदीपने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 69 बळी घेतले आहेत.
advertisement
कुलदीप यादवने चार कसोटी सामन्यात 19 कॅरेबियन फलंदाजांना, 19 एकदिवसीय सामन्यात 33 आणि नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 17 बळी घेतले आहेत.
advertisement