Mumbai Fire : मुंबईतील कुर्लामध्ये मध्यरात्री अग्नितांडव, काही दुकाने जळून खाक
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai Fire : मुंबईतील कुर्ला परिसरात मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही दुकाने जळून खाक झाली.
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत काही दुकाने जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग नेमकी कशी लागली, याबाबतची अधिक माहिती समोर आली नाही. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
कुर्ला पश्चिम येथील दुकाने, औद्योगिक भाग असलेल्या ठिकाणी एका दुकानाला रात्री उशिरा अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की इतरही काही दुकानांना त्याची झळ बसली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. Now Traffic Is Clear. #MTPTrafficUpdate
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 13, 2025
advertisement
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांना मोठे प्रयत्न करावे लागले. चिंचोळा मार्ग आणि इतर अडथळ्यांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीमुळे सांताक्रूझ-कुर्ला लिंक रोड काही वेळेसाठी बंद करण्यात आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 7:46 AM IST