कृषी विभागाचा मोठा निर्णय! फळपीक विम्यासाठी शेतकऱ्यांना Farmer ID असणार बंधनकारक
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : हवामानातील वाढत्या अनिश्चिततेचा विचार करून राज्य सरकारने हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२५ बहरात विविध फळपिकांचा समावेश केला आहे.
नाशिक : हवामानातील वाढत्या अनिश्चिततेचा विचार करून राज्य सरकारने हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२५ बहरात विविध फळपिकांचा समावेश केला आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांपासून आर्थिक संरक्षण देणे हा आहे. नाशिक जिल्ह्यासाठी या योजनेत डाळिंब, काजू, केळी, द्राक्ष, आंबा (आंबिया बहर) आणि स्ट्रॉबेरी या महत्त्वाच्या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.
कोणते कागदपत्रे असणार बंधनकारक?
या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, ७/१२ उतारा, फळबागेचे अक्षांश व रेखांशासहित फोटो, तसेच बँक पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. यासोबतच ‘अॅग्रीस्टॅक’ अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक देणे बंधनकारक आहे. या क्रमांकाशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
या योजनेअंतर्गत हवामानातील कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता अशा विविध जोखमींपासून फळपीकांचे संरक्षण मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे पीक ई-पीक पाहणी प्रणालीत नोंदलेले असणे आवश्यक आहे. जर ई-पीक पाहणीतील नोंद आणि विमा उतरविलेल्या पिकामध्ये विसंगती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
advertisement
योजनेतील विमा रक्कम (प्रति हेक्टर)
काजू : १,२०,००० ते ३,८०,००० रु
स्ट्रॉबेरी : १,७०,००० ते २,४०,००० रु
डाळिंब : १,६०,००० रु
केळी : ८,५०० ते १९,००० रु
आंबा : ६,००० ते १२,००० रु
ही विमा योजना प्रत्यक्ष हवामानाच्या आकडेवारीवर आधारित असल्याने शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्याची त्वरित भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत विमा हप्ता भरावा लागेल. तर विविध फळपिकांसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
advertisement
केळी : १५ ऑक्टोबर २०२५
आंबा : ३१ डिसेंबर २०२५
स्ट्रॉबेरी आणि इतर फळपिके : १४ ऑक्टोबर ते १४ जानेवारी २०२६
view commentsदरम्यान, शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे वेळेत तयार ठेवावीत. अॅग्रीस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळविणे अत्यावश्यक आहे. एकदा हा क्रमांक मिळाल्यावरच शेतकरी योजनेत सहभाग नोंदवू शकतात. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 7:48 AM IST