खूप मजा केली! आता संकटं झेलायला तयार राहा, या 3 राशींच्या मागे लागणार कडक साडेसाती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shani SadeSati: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण या काळात अनेक प्रमुख ग्रह आपल्या राशी परिवर्तनामुळे मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहेत.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण या काळात अनेक प्रमुख ग्रह आपल्या राशी परिवर्तनामुळे मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहेत. विशेषतः शनीदेव या वर्षात निर्णायक भूमिका बजावतील, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. सध्या शनी मीन राशीत स्थित असून २०२६ अखेरपर्यंत त्यांचे भ्रमण याच राशीत राहणार आहे. शनीचा स्वभाव न्यायप्रिय, शिस्तप्रिय आणि कर्मावर आधारित फल देणारा असल्याने त्याच्या संक्रमणाचा परिणाम काही राशींवर कठोर, तर काहींसाठी सुधारक ठरू शकतो. या काळात काही राशींना साडेसातीचा प्रभाव जाणवेल, तर काही राशींना आर्थिक व करिअरच्या दृष्टीने संधी मिळतील. जाणून घेऊया शनीच्या या संक्रमणाचा विविध राशींवर नेमका काय परिणाम होणार आहे.
advertisement
मीन रास - मीन राशीतील व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. शनी याच राशीत असल्यामुळे मानसिक ताण, कामाच्या ठिकाणी अचानक बदल आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते. नोकरीत अस्थिरता जाणवू शकते किंवा वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुकांसाठी अडथळे येऊ शकतात, तसेच प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज वाढू शकतात. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची चिन्हे असून बचतीकडे दुर्लक्ष झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने थकवा, झोपेचा अभाव आणि पचनासंबंधी तक्रारी संभवतात. या काळात मीन राशीच्या लोकांनी आळस टाळून शिस्तबद्ध दिनचर्या स्वीकारणे आवश्यक ठरेल.
advertisement
मेष रास - मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष तुलनेने सकारात्मक ठरू शकते. जरी साडेसातीचा प्रभाव काही प्रमाणात जाणवत राहील, तरी प्रयत्नांना योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात परदेशी संपर्क, नवीन प्रकल्प किंवा वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकतो. मात्र आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे. नातेसंबंध टिकवण्यासाठी बोलण्यात संयम ठेवावा लागेल. करिअरविषयक महत्त्वाचे निर्णय घेताना घाई न करता कुटुंबीयांचा सल्ला घेणे हितावह ठरेल. योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे अडचणींवर मात करता येईल.
advertisement
कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुलण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि वेळेचा ताणही वाढेल. नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संवादात स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण प्रवास टाळावा तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. वाहन खरेदी किंवा मोठी गुंतवणूक करण्याची इच्छा निर्माण होईल, पण निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक स्थितीचा नीट विचार करणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी गुंतवणुकीत सावधगिरी बाळगावी.
advertisement
advertisement










