हिंदुस्थान झिंक ते तलवंडी पॉवर... किती कोटींचे मालक होते अग्निवेश? 'Vedanta' कंपनीत काय जबाबदारी होती?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अनिल अग्रवाल यांच्या पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत स्कीइंग अपघातानंतर निधन, वेदांता समूहावर शोककळा, ७५ टक्के संपत्ती दानाचा अनिल अग्रवाल यांचा संकल्प.
"माझा लाडका मुलगा अग्निवेश आम्हाला खूप लवकर सोडून गेला. तो केवळ ४९ वर्षांचा होता, आयुष्याने आणि स्वप्नांनी भरलेला होता..." अशा अत्यंत जड अंतःकरणाने प्रसिद्ध उद्योगपती आणि 'वेदांता' समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपला पुत्रशोक जगासमोर मांडला आहे. ४.२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेचे मालक असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला आहे.
अग्निवेश अग्रवाल आपल्या मित्रासोबत अमेरिकेत 'स्कीइंग' करत असताना त्यांना अपघात झाला आणि गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवेशच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती आणि सर्वात वाईट परिस्थिती संपली आहे असं वाटत असतानाच, बुधवारी (७ जानेवारी) त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
पाटणा ते युएई: अग्निचा झंझावाती प्रवास
३ जून १९७६ रोजी बिहारच्या पाटण्यामध्ये जन्मलेले अग्निवेश हे अनिल अग्रवाल यांचे एकुलते एक सुपुत्र होते. अजमेरच्या प्रसिद्ध मेयो कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्योग विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी युएई (UAE) मध्ये 'फुजैराह गोल्ड' ही रिफायनरी कंपनी स्थापन करून आपल्या व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखवली. याशिवाय, त्यांनी 'हिंदुस्थान झिंक'चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सध्या ते वेदांता समूहाची उपकंपनी असलेल्या 'तलवंडी साबो पॉवर लिमिटेड' (TSPL) च्या संचालक मंडळावर सक्रिय होते.
advertisement
ऐश्वर्याच्या शिखरावर असूनही साधेपणाचा वारसा
अग्निवेश हे केवळ उद्योजक नव्हते, तर ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. ते एक उत्तम संगीतप्रेमी आणि क्रीडाप्रेमी नेते म्हणून ओळखले जात. इतकी मोठी श्रीमंती असतानाही त्यांच्या सौम्य आणि मानवी स्वभावामुळे ते सर्वत्र प्रिय होते. त्यांच्या जाण्याने केवळ अग्रवाल कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण व्यावसायिक समुदायावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
advertisement
अनिल अग्रवालच्या कुटुंबात त्यांची पत्नी किरण अग्रवाल यांचा समावेश आहे, जी अजूनही प्रसिद्धीपासून दूर आहे. अनिल अग्रवालला दोन मुले होती: मुलगा अग्निवेश अग्रवाल आणि मुलगी प्रिया अग्रवाल हेब्बर. त्यांची मुलगी प्रिया सध्या वेदांत आणि हिंदुस्तान झिंकच्या संचालक मंडळावर काम करते आणि हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्षपदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळते.
लेकाच्या आठवणीत ७५ टक्के संपत्ती दानाचा संकल्प
पुत्रवियोगाच्या या कठीण काळात अनिल अग्रवाल यांनी आपल्या मुलाला दिलेले वचन पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. "अग्निवेशचे स्वप्न होते की भारतातील कोणताही मूल उपाशी राहू नये, सर्वांना शिक्षण आणि रोजगार मिळावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या कमाईतील ७५ टक्के हिस्सा धर्मादाय कामांसाठी दान करणार आहे," असे त्यांनी जाहीर केले. उर्वरित आयुष्य अधिक साधेपणाने जगून मुलाचे सामाजिक उद्दिष्ट पूर्ण करणे, हीच त्याला खरी श्रद्धांजली असेल, असेही त्यांनी नमूद केले.
advertisement
अग्निवेश किती कोटींचे मालक होते याची थेट माहिती जरी नसली तरी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल त्यांचे वडील हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातात. संडे गार्डियनमधील एका वृत्तानुसार, त्यांच्याकडे अंदाजे ४.२ अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे ₹३.६६ लाख कोटींची मालमत्ता आहे. अनेक दशकांमध्ये, अग्रवाल यांनी वेदांताला एका सामान्य सुरुवातीपासून एक मोठी जागतिक कंपनी बनवले, जस्त, तांबे, अॅल्युमिनियम, तेल आणि वायू आणि वीज यासारख्या क्षेत्रात जगभरात त्यांचे कामकाज वाढवले. परंतु त्यांच्या संपत्ती असूनही, काल त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 12:55 PM IST
मराठी बातम्या/मनी/
हिंदुस्थान झिंक ते तलवंडी पॉवर... किती कोटींचे मालक होते अग्निवेश? 'Vedanta' कंपनीत काय जबाबदारी होती?









