पैशाचा वाद नव्हे भलतंच कांड, संभाजीनगरमधील ‘त्या’ प्रकरणाला धक्कादायक वळण, प्रेयसीमुळं...
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात मित्रानेच मित्राचा काटा काढल्याने खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
छत्रपती संभाजीनगर: मोबाइल आणि पैशांच्या वादातून शकील आरेफ शेख (20, रा. फुलेनगर, पंढरपूर) या तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची बाब मंगळवारी उघडकीस आली. तपासात मात्र मोबाइल व पैशांसोबतच मुख्य आरोपी शेख रिहान ऊर्फ जब्बार शेख इब्राहिम याच्या प्रेयसीच्या वादाचीही या खुनाला किनार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हे शाखेने बुधवारी पहाटेपर्यंत या प्रकरणातील सातही आरोपींना अटक केली आहे.
4 जानेवारी रोजी शकील हा आपल्या मित्रासह आणि प्रमुख आरोपी सय्यद सिराज ऊर्फ मारी याच्यासोबत घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. अखेर मंगळवारी मिटमिटा ऊर्जाभूमी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर फौजदार प्रवीण वाघ, जगन्नाथ मेनकुदळे, अर्जुन कदम आणि अभिजित चिखलीकर यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत आठही हल्लेखोरांचा शोध सुरू केला. यातील काही आरोपी मालेगाव येथे पसार झाले होते. अखेर बुधवारी पहाटेपर्यंत सात जणांना अटक करण्यात आली.
advertisement
हल्लेखोरांनी 4 जानेवारी रोजी शकीलचे अपहरण केले. त्याला पडेगाव येथील सिराज ऊर्फ मारीच्या खोलीवर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली तसेच चाकूने वार करण्यात आले. त्या ठिकाणीच त्याच्यावर उपचारही करण्यात आले. या वेळी सुटका झाल्यानंतर सर्वांना ठार मारण्याची धमकी शकीलने दिल्याने हल्लेखोर अधिकच संतप्त झाले. त्याच रागातून त्यांनी पुन्हा मारहाण करत शकीलचा खून केला आणि मृतदेह जटवाडा परिसरात फेकून दिला.
advertisement
या प्रकरणात रिहानच्या प्रेयसीवरून वाद झाल्याचेही तपासात समोर आले आहे. यासंदर्भात पोलिस पथकाने रेल्वेस्थानक परिसरातील दोन तरुणींची चौकशी केली. सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती छावणी ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विवेक जाधव यांनी दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी
view commentsपोलिसांनी शेख रिहान ऊर्फ जब्बार शेख इब्राहिम (23, रा. बारूदगरनाला, सिटी चौक), शेख साहिल ऊर्फ बाबा शेख राजू (23, रा. बुढी लेन), सय्यद सिराज ऊर्फ मारी सय्यद नासेर (29), कबीर शहा अयूब शहा (25), शेख फैजान शेख गुलाम मोईयोद्दीन (22), शेख राहिल शेख नजीर (23) आणि शेख शाहीद शेख नजीर (29, सर्व रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आठवा साथीदार अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी दिली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 12:39 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पैशाचा वाद नव्हे भलतंच कांड, संभाजीनगरमधील ‘त्या’ प्रकरणाला धक्कादायक वळण, प्रेयसीमुळं...










