Indian Oil Jobs : इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?;संधी गमावू नका
Last Updated:
Indian Oil Job : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
मुंबई : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइलने विविध अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर केली असून ही भरती देशातील अनेक राज्यांमध्ये होणार आहे. सरकारी कंपनीत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
अर्ज करण्याची तारीख जाणून घ्या
या भरती अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस अशा विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना 12 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 'National Apprenticeship Promotion Scheme' किंवा 'National Apprenticeship Training Scheme'पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.
advertisement
या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ITI, NCVT प्रमाणपत्रधारक, 3 वर्षांचा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेले उमेदवार पात्र आहेत. याशिवाय BBA, BA, B.Com, B.Sc तसेच 12वी उत्तीर्ण उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
उमेदवारांचे वय 18ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 12:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Indian Oil Jobs : इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?;संधी गमावू नका









