पुण्यातील NDA मध्ये रॅगिंग? कॅडेटच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठा वाद, कुटूंबियांनी केला धक्कादायक आरोप!

Last Updated:

Pune NDA Crime : जेव्हा अंतरिक्ष त्याच्या नेहमीच्या सकाळच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित होता, तेव्हा त्याच्या वर्गमित्रांनी त्याचा शोध सुरू केला. तो त्याच्या खोलीत बेडशीटला लटकलेला आढळला.

Pune NDA Student suspicious Ends life
Pune NDA Student suspicious Ends life
Pune Crime News : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंतरीक्ष कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेशचा होता. 18 वर्षाच्या अंतरीक्षने चार महिन्यांपूर्वी पुण्यातील एनडीएमध्ये आला होता. अंतरिक्षने शुक्रवारी पहाटे आपल्या खोलीमध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं. त्यामुळे आता पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता त्याच्या कुटूंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

बेडशीटला लटकलेला आढळला

जेव्हा अंतरिक्ष त्याच्या नेहमीच्या सकाळच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित होता, तेव्हा त्याच्या वर्गमित्रांनी त्याचा शोध सुरू केला. तो त्याच्या खोलीत बेडशीटला लटकलेला आढळला. त्यानंतर त्याला ताबडतोब खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

छळ असह्य झाला अन्...

अंतरिक्षला गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ कॅडेट्सकडून त्रास दिला जात होता. आम्ही ही बाब अकादमीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हा छळ असह्य झाला आणि त्याने हे कठोर पाऊल उचलले. हा रॅगिंगचा खटला आहे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, असा आरोप अंतरिक्षच्या कुटूंबियांनी केला आहे.
advertisement

देशसेवेचे स्वप्न पण रॅगिंगने घेतला जीव

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, अंतरीक्ष कुमार हा माजी सैनिकाचा मुलगा होता. त्याचे वडील भारतीय सैन्यात सेवेत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न घेऊन अंतरीक्षने जुलै महिन्यात पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला होता. तो सध्या पहिल्या सत्रात शिक्षण घेत होता.

NDA म्हणजे काय?

advertisement
राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ज्याला NDA म्हणूनही ओळखले जाते, ही भारतीय सशस्त्र सेवांसाठी एक अकादमी आहे जी खडकवासला, पुणे येथे आहे. पुणे दौऱ्याचा भाग म्हणून इतिहासप्रेमींसाठी ही एक सर्वोत्तम ठिकाण आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी संयुक्त सेवा अकादमी म्हणून काम करते जिथे कॅडेट्सना सशस्त्र दलांच्या तीन प्रमुख शाखांसाठी प्रशिक्षण दिले जाते. NDA मध्ये त्यांचा वेळ घालवल्यानंतर, कॅडेट्स त्यांच्या संबंधित सेवा अकादमींमध्ये प्री-कमिशनिंग प्रशिक्षणासाठी पुढे जातात.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील NDA मध्ये रॅगिंग? कॅडेटच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठा वाद, कुटूंबियांनी केला धक्कादायक आरोप!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement