Diwali Bus : दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा, पिंपरी चिंचवडमधून 396 अधिक बस, असे करा आरक्षण
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पिंपरी-चिंचवड आगारातून तब्बल 396 जादा एसटी बस सुटणार असून विविध मार्गांवर धावणार आहेत. यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) मोठी तयारी केली आहे. पिंपरी-चिंचवड आगारातून तब्बल 396 जादा एसटी बस सुटणार असून, या बसेस 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान विविध मार्गांवर धावणार आहेत. यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले आणि दिवाळी सण साजरा करण्यासाठी गावी जाण्याची इच्छा असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात एसटी सेवांचा लाभ घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये जाणाऱ्या या बससेवेमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
advertisement
या जादा बससेवांसाठी आगारांमध्ये योग्य पार्किंग, तिकीट आरक्षण, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. तिकीट दरात सवलत योजनेअंतर्गत काही सवलतीदेखील देण्यात आल्या आहेत. 4 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवास, 12 वर्षांखालील मुलांना अर्धे तिकीट, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण मोफत प्रवास देण्यात आला आहे. तसेच महिला प्रवाशांसाठीही अर्धे तिकीट लागू आहे.
advertisement
असे करा बस आरक्षण
view commentsआरक्षणासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांना www.msrtc.gov.in आणि www.msrtcors.co.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय सर्व प्रमुख आगारांवर आणि अधिकृत आरक्षण केंद्रांवरही प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 13, 2025 8:53 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Diwali Bus : दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा, पिंपरी चिंचवडमधून 396 अधिक बस, असे करा आरक्षण