Pune News : रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, गहू-तांदळासोबत आता मिळणार ज्वारीही, कधीपासून होणार वाटप?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, राज्य सरकारने देखील त्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे.
पुणे : रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, राज्य सरकारने देखील त्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबरपासून दोन महिन्यांसाठी रेशन दुकानांमध्ये ज्वारीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना गहू आणि ज्वारीचा लाभ
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदीसंबंधी केंद्र सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा (2024-2025) राज्यात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, सरकारने त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून ज्वारीचे प्रत्येकी एक किलो वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना ज्वारीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पुढील दोन महिन्यांसाठी ज्वारी उचल प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही जिल्हा पुरवठा विभागाला दिल्या आहेत.
advertisement
राज्यातील पुणे शहर आणि जिल्हा, तसेच सातारा, सांगली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर आणि सोलापूर (शहर व जिल्हा) या बारा जिल्ह्यांसाठी एकूण 22 हजार 766 टन ज्वारीची आवश्यकता आहे. तर हिंगोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी 4,013 हेक्टर इतकी ज्वारी लागणार आहे. या जिल्ह्यांसाठी अकोला येथून ज्वारी उचलण्याचे, तर उर्वरित बारा जिल्ह्यांसाठी बुलढाणा येथून धान्य उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
पुणे शहरासाठी 1,374 टन, तर जिल्ह्यासाठी 2,844 टन अशा एकूण 4,218 टन ज्वारी धान्याची आवश्यकता राहणार आहे. आतापर्यंत रेशन दुकानदारांतून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ मोफत दिले जात होते. मात्र, आता नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना गहू आणि ज्वारी प्रत्येकी एक किलो या प्रमाणात वितरित केले जाणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 13, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, गहू-तांदळासोबत आता मिळणार ज्वारीही, कधीपासून होणार वाटप?