सिनेमापेक्षाही थरारक! इतवारी एक्सप्रेसमध्ये पोलिसांनी बॅग उघडली अन् डोळे चकाकले, ट्रेनमधून 3.37 कोटींचं सोनं जप्त

Last Updated:

गोंदिया एक्सप्रेसमध्ये नरेश पंजवानीकडून 3.27 कोटींचे सोने व 7.5 किलो चांदी जप्त, आरपीएफने डीआरडीआयकडे प्रकरण सोपवले, तस्करीचा मोठा डाव उधळला.

News18
News18
गोंदिया, प्रतिनिधी रवी सपाटे: पोलिसांना टीप मिळाली आणि त्यांनी अख्खी एक्सप्रेस पालथी घातली, प्रवाशांच्या बॅगांचं चेकिंग सुरू झालं. त्यातील एका प्रवाशाची बॅग उघडली आणि अक्षरश: डोळेच चकाकले आहेत. नुसती झळाळी, बॅगेतून चक्क चेन, सोन्याचे आणि चांदीचे दागिने, कॉईन आणि बिस्कीटं नुसती दिसत होती. पोलिसांनी तातडीनं मुद्देमाल आणि आरोपीला ताब्यात घेतलं. ही धक्कादायक घटना इतवारी 'एक्सप्रेस'मध्ये घडली.
एखाद्या सिनेमात जसं सोन्या चांदीचं घबाड हाती लागवं असा सीन बघायला मिळतो तसाच प्रकार गोंदियामध्ये घडला आहे. रेल्वेतून सोन्या-चांदीची तस्करी करण्याचा मोठा डाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने उधळून लावल. एका प्रवाशाकडून तब्बल 3 कोटी 37 लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आली. गोंदिया इथे एका गोल्ड सप्लायरला याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये आमगाव ते गोंदिया दरम्यान तपासणी सुरू केली. कोच नंबर एस- 06 मध्ये एका व्यक्तीवर संशय आल्याने त्याची बॅग तपासली. त्यामध्ये सोन्या-चांदीचा मोठा साठा सापडला. गोंदियाचा गोल्ड सप्लायर नरेश पंजवानी असं या प्रवाशाचे नाव आहे. तो गोंदियातील 'गोल्ड सप्लायर' असल्याचे समोर आले आहे.
advertisement
या व्यक्तीच्या बॅगेत 3.27 कोटींचे सोने आणि 7.5 किलोहून अधिक चांदी आढळली. साठ्याबद्दल समाधानकारक माहिती न देऊ शकल्याने आरपीएफने हे प्रकरण डीआरडीआयच्या (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिकाऱ्यांकडे सोपवले. त्यांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिनेमापेक्षाही थरारक! इतवारी एक्सप्रेसमध्ये पोलिसांनी बॅग उघडली अन् डोळे चकाकले, ट्रेनमधून 3.37 कोटींचं सोनं जप्त
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement