BMC Housing Lottery : बाप रे बाप! गरिबांच्या घराची किंमत एक कोटींवर, BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी

Last Updated:

BMC Housing Scheme : मुंबई महापालिकेतर्फे 300 हून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे, मात्र घरांच्या किंमती पाहून धक्का बसेल.

News18
News18
मुंबई : मुंबई महापालिकेच्या घरांसाठी पुन्हा एकदा मोठा सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या घरांच्या किमती पाहून अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेला 15 टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत तसेच विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत एकूण 426 घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. महापालिकेने म्हाडाच्या धर्तीवर संगणकीय सोडतीद्वारे ही घरे पहिल्यांदाच सोडत काढण्याचे ठरवले असून, आठवड्याभरात यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
अशी आहे 'या' घरांची किंमत
या सोडतीतील घरे अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील घरे 270 चौ. फुटांची असून त्यांची विक्री किंमत एक कोटी 7 लाख रुपये आहे. अल्प उत्पन्न गटातील घरे 528 चौ. फुटांची असून त्यांची किंमत 60 लाख ते 1 कोटी 7 लाखांच्या दरम्यान आहे. या घरांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये असून पात्र व्यक्ती आणि कुटुंबीयच यासाठी अर्ज करू शकतात.
advertisement
या दिवशी करता येणार अर्ज
महापालिकेच्या माहितीप्रमाणे या घरांची सोडत काढणी दिवाळीनंतर केली जाणार आहे आणि दिवाळीतच अर्ज भरता येणार आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की या घरांची किंमत पाहून इच्छुक नागरिकांना थोडा धक्का बसू शकतो कारण ही घरे सामान्य मुंबईकरांसाठी अपेक्षेपेक्षा महाग आहेत.
या मोकाच्या ठिकाणी आहेत घर
घरे मुंबईच्या विविध भागांमध्ये आहेत, ज्यात भायखळा (पश्चिम), कांदिवली (पूर्व), कांदिवली (पश्चिम), अंधेरी (पूर्व), जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पश्चिम), दहिसर (पश्चिम), कांजूरमार्ग आणि भांडुप (पश्चिम) यांचा समावेश आहे. भायखळ्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 1 कोटी 7 लाख रुपये असून या भागातील 270 चौ. फुटांचे घर सामान्य मुंबईकरांसाठी खूप महाग आहे.
advertisement
महापालिकेच्या या नव्या योजनेत संगणकीय सोडतीद्वारे घरांची निवड केली जाणार असल्याने पारदर्शकता राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, घरांच्या किमती आणि उपलब्धतेमुळे अनेक इच्छुक नागरिकांसाठी हा संधीपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरणार आहे. या सोडतीतून मिळणाऱ्या घरांनी मुंबईतील कमी उत्पन्न गटातील नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल, तरीही किमतींमुळे अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणे अवघड होईल.
advertisement
या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष आणि अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे याबाबत महापालिका लवकरच अधिक माहिती जाहीर करणार आहे. दिवाळीनंतर घरांची सोडत काढणी होणार असल्याने इच्छुक नागरिकांनी वेळेवर अर्ज करण्याची तयारी ठेवावी. या योजनेतून महापालिका मुंबईतील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्थिर घर देण्याचा प्रयत्न करत आहे पण घरांच्या किंमती आणि जागांचे मर्यादित प्रमाण यामुळे ही संधी सर्वांसाठी सहज साध्य होणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Housing Lottery : बाप रे बाप! गरिबांच्या घराची किंमत एक कोटींवर, BMC कडून 426 घरांसाठी लॉटरी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement