IND vs WI 2nd Test : दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय, 2-0 ने मालिका खिशात, केएल राहुलने 50 मिनिटात संपवली मॅच!

Last Updated:

India Win Delhi Test Against West indies : चौथ्या दिवसाच्या अखेरीस, टीम इंडियाला विजयासाठी 58 धावांची गरज असल्याने केएल राहुलने पहिल्या तासाभरात खेळ खल्लास केला.

India Win Delhi Test Against West indies
India Win Delhi Test Against West indies
India vs West indies 2nd Test : अहमदाबाद टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियाने दिल्लीतील कसोटी सामना देखील जिंकला आहे. टीम इंडियाने मालिकेतील दोन्ही सामने जिंकले असून मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने पाचव्या दिवशी फक्त 50 मिनिटात मॅच जिंकली. चारही दिवस वर्चस्व गाजवल्यानंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात विजयाची नोंद झाली आहे. सात विकेट्स राखून टीम इंडियाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाकडून केएल राहुलने धमाकेदार अर्धशतक ठोकलं. टीम इंडियाला विजयासाठी 121 रनचं आव्हान मिळालं होतं.

पहिल्या तासाभरात खेळ खल्लास

चौथ्या दिवसाच्या अखेरीस, टीम इंडियाला विजयासाठी 58 धावांची गरज असल्याने साई सुदर्शन आणि केएल राहुल पहिल्या तासाभरात खेळ खल्लास आणि मालिका खिशात घालतील, अशी शक्यता होती. मात्र सुदर्शनने आक्रमक खेळण्याच्या नादात विकेट गमावली. तर त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने देखील हवेत बॉल मारला अन् तो देखील आऊट झाला. त्यानंतर मात्र, केएल राहुलने संयमी खेळी केली अन् विजय निश्चित केला.
advertisement

विजयासाठी 121 रनचं आव्हान पार

भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना 3-3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराजला 2 विकेट घेण्यात यश आलं होतं. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही 1-1 विकेट मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचा 390 रनवर ऑलआऊट झाल्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 121 रनचं आव्हान मिळालं होतं. टीम इंडियाने हे आव्हान एका तासातच पार केलं.
advertisement
वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन : जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (कॅप्टन), टेविन इम्लाच (विकेटकीपर), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 2nd Test : दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय, 2-0 ने मालिका खिशात, केएल राहुलने 50 मिनिटात संपवली मॅच!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement