Mumbai Weather Today : पाऊस थांबला; पारा चढला! मुंबईसह कोकणाला हवामान विभागाचा नवा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या कोकणात ‘ऑक्टोबर हीट’ सुरू झाली असून वातावरण कोरडे आणि उकाड्याने भरलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सप्टेंबरच्या शेवटपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती, मात्र आता पावसाला पूर्णविराम मिळाला असून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या कोकणात ‘ऑक्टोबर हीट’ सुरू झाली असून वातावरण कोरडे आणि उकाड्याने भरलेले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सध्या हवामान स्थिर आहे. समुद्राच्या ओलाव्यामुळे थोडासा गारवा जाणवत असला तरी दुपारच्या वेळी उकाड्याची लाट जाणवेल. तापमान 32 ते 34 अंशांच्या दरम्यान राहणार असून आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याने वातावरण कोरडे आणि गरम झाले आहे.








