Bigg Boss 19 मध्ये सलमान खानने दिला सर्वात मोठा धक्का! मास्तरमाईंडलाच काढलं घराबाहेर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस 19' या लोकप्रिय कार्यक्रमातून या आठवड्यात एका तगड्या स्पर्धकाला नारळ मिळाला आहे. त्यामुळे स्पर्धकांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
Bigg Boss 19 Weekend Ka Vaar : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. यंदाचा सीझन प्रेक्षकांचं सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र या शोमधील वीकेंड का वारच्या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. कारण याच दिवशी सलमान खान केवळ घरातील सदस्यांची शाळा घेत नाहीत, तर एलिमिनेशनही होतं. मात्र यावेळीचा 'वीकेंड का वार' अत्यंत धक्कादायक ठरला आहे. कारण एका अत्यंत तगड्या स्पर्धकाला अचानकपणे घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे घरातील सर्व स्पर्धकांसह 'बिग बॉस'प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
Bigg Boss 19 चा मास्तरमाईंड घराबाहेर!
'बिग बॉस 19'च्या या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्यांची यादी मोठी होती. यामध्ये झीशान कादरी, नीलम गिरी, बसीर अली, अशनूर कौर, प्रणित मोरे आणि मृदुल तिवारी यांचा समावेश होता. अनेकांना वाटले होते की यावेळी कदाचित अशनूर कौर किंवा प्रणित मोरे घराबाहेर जातील. पण सर्वांचे अंदाज खोटे ठरवत. शोमधील सर्वात तगड्या स्पर्धकाला एलिमिनेट करण्यात आले. खरं तर, कमीत कमी मतं मिळाल्यामुळे झीशान कादरीला शोमधून बाहेर जावं लागलं. झीशानला घरात मास्तरमाईंड म्हटलं जात होतं. त्यामुळे त्याची अचानक झालेली एक्झिट घरातील सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही मोठा धक्का ठरला आहे.
advertisement
झीशानची एक्झिट एवढी धक्कादायक का?
झीशान कादरी हा शोच्या सुरुवातीपासूनच खूप अॅक्टिव्ह होता आणि एका खिलाडू वृत्तीच्या गटाचं नेतृत्व करत होता. मात्र, त्यांला प्रेक्षकांकडून जास्त मतं मिळाली नाहीत. त्यामुळे त्याचा प्रवास इथेच संपला. त्याच्या जाण्यामुळे घरातील संपूर्ण समीकरण बदलणार असून त्यांच्या ग्रुपवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
advertisement
सलमान खानने तान्या मित्तलची घेतली शाळा
view comments'बिग बॉस 19'च्या या वीकेंड का वारमध्ये केवळ एलिमिनेशनच नाही, तर एक मोठी वादग्रस्त घटना देखील पाहायला मिळाली. सलमान खानने घरातील तान्या मित्तलच्या वागणुकीवर आणि सवयींवर जोरदार टीका केली. सलमानने तिला तिच्या चुका दाखवून देत रिअॅलिटी चेक दिला. 'बिग बॉस 19'च्या या सीझनची सुरुवात 16 स्पर्धकांसोबत झाली होती. त्यानंतर मालती चहर आणि शहबाज बदेशा यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 9:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 मध्ये सलमान खानने दिला सर्वात मोठा धक्का! मास्तरमाईंडलाच काढलं घराबाहेर