सोमवारची सकाळ मुंबईकरांसाठी त्रासाची! आसनगाव-वासिंद दरम्यान एक्स्प्रेसमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated:

आसनगाव-वासिंद दरम्यान एक्स्प्रेस गाडीत तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, मुंबईकरांना ऑफिस शाळेत उशिर, प्रवाशांची मोठी गैरसोय.

News18
News18
अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई: दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज ऑफिसला पोहोचण्यासाठी पुन्हा लगबग सुरू झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील आसनगाव आणि वासिंद या दोन स्थानकांदरम्यान एका एक्स्प्रेस गाडीत झालेल्या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. त्यामुळे सकाळी लवकर कार्यालयात पोहोचण्याच्या घाईत असलेल्या मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
दोन्ही मार्गांवर परिणाम, वेळापत्रक बिघडले
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसनगाव-वासिंद पट्ट्यात एक्स्प्रेस गाडीमध्ये जो बिघाड झाला आहे, तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. एरवी ५-१० मिनिटं उशिरा असणाऱ्या गाड्या आता जास्तच उशिरा असल्याने शाळा कॉलेज आणि ऑफिसला पोहोचणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
advertisement
बॉसची बोलणी खावी लागणार
सोमवारचा दिवस आणि त्यात सकाळची वेळ, म्हणजे मुंबईत कामावर जाण्याची सर्वाधिक गर्दीची वेळ. अशा वेळी वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांची मोठी धावपळ उडाली आहे. अनेक लोकल स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी जमा झाली आहे. पहिल्याच दिवशी उशिर झाल्याने आज बॉसची बोलणी खावी लागणार असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
वेळ राखून घराबाहेर पडा
एक्स्प्रेस गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तातडीने दुरुस्तीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, ही तांत्रिक अडचण नेमकी कधीपर्यंत दूर होईल आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत कधी सुरू होईल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत वेळ किंवा माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्ही ऑफिस, शाळा किंवा कॉलेजसाठी घराबाहेर पडत असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून आणि थोडा हाताशी वेळ राखूनच घराबाहेर पडा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
सोमवारची सकाळ मुंबईकरांसाठी त्रासाची! आसनगाव-वासिंद दरम्यान एक्स्प्रेसमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement