Old Monk आणि हजारो भारतीयांना मारणाऱ्या जनरल डायरचा काय संबंध? 'हे' सत्य तुम्हाला माहितच नसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर Old Monk चा जालियन वाला हत्याकांडमधील भारतीयांचा हत्यारा जनरल डायर याच्याशी संबंध आहे. आता तुम्हाला यानंतर अनेक प्रश्न पडले असतील? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
आजकाल सोशल मीडियावर आणि चर्चेत अनेकदा ऐकायला मिळतं की काही लोकप्रिय ब्रँड्सच्या मागे काही अनोख्या आणि ऐतिहासिक कहाण्या असतात. अशाच एका रोचक गोष्टीचा संबंध भारतातील सर्वात प्रसिद्ध रम ब्रँड ‘ओल्ड मॉन्क’शी आहे. ओल्ड मोंक हा अनेक भारतीयांचा आवडता ब्रँड आहे. पण अनेकांना या ब्रँडसंबंधीत बरीच कमी माहिती आहे.
advertisement
advertisement
बहुतेक लोकांना माहिती नसते, पण जनरल हॅरी डायर, ज्यांनी 1919 मध्ये जलियावालां बाग हत्याकांडाचे आदेश दिले, त्यांच्या वडिलांचे नाव एडवर्ड अब्राहम डायर होते. एडवर्ड अब्राहम डायर 1820 मध्ये इंग्लंडहून भारतात आले आणि त्यांनी भारतात पहिली ब्रुअरी उभारण्याचा प्रयत्न केला. 1855 मध्ये हिमाचल प्रदेशातील कसौलीत त्यांनी 'डायर ब्रुअरी' उभारली, जिथे भारतातील पहिली बिअर बनवली गेली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










