Pune News : दिवाळीसाठी पुण्यातून जादा विमाने, गर्दी टाळण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून कशी आहे व्यवस्था?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
दिवाळी जवळ येत असल्याने पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. या वाढत्या प्रवाशांमुळे विमानतळ प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे
पुणे: दिवाळी जवळ येत असल्याने पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. या वाढत्या प्रवाशांमुळे विमानतळ प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांना अडचण म्हणून सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांची तपासणी वेळेत पूर्ण करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.
पुणे शहरात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने, दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे रिझर्व्हेशन फुल्ल झाले आहे. त्यामुळे अनेक प्रवासी विमान प्रवासाला प्राधान्य देतात.
advertisement
गर्दी टाळण्यासाठी व्यवस्था
व्यस्त आणि कमी गर्दीच्या वेळी प्रवाशांसाठी विमानतळ प्रशासनाकडून विशेष योजना करण्यात आली आहे. इन लाइन, बॅगेज स्क्रीनिंगचा वापर, रांग व्यवस्थापन, एक्स रे मशीनचा प्रभावी वापर या गोष्टींकडे विमानतळ प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ देखील वाढवण्यात आले आहे.
सुरक्षेची अधिक काळजी
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीआयएसएफकडून तयारी करण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी सुरक्षा तपासणीसाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील विशेष काळजी घेण्यात आली आहे.
advertisement
विमानतळावर तीन तास अगोदर पोहोचा
view commentsदिवाळीत विमानतळ परिसरात वाहनांची मोठी गर्दी होणार असल्यामुळे, वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे विमानतळ प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडून समन्वय साधण्यात आला आहे. प्रवाशांनी दिवाळीच्या काळात तीन तास अगोदर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 13, 2025 9:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : दिवाळीसाठी पुण्यातून जादा विमाने, गर्दी टाळण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून कशी आहे व्यवस्था?