'माझा माणूस, नीट काळजी घ्या', जेव्हा ऑनस्क्रिन सासऱ्यांसाठी रितेशनं डॉक्टरांना दिला होता 'डोस'

Last Updated:
Vidyadhar Joshi - Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख इंडस्ट्रीत भाऊ म्हणून ओळखला जातो. त्याच्या दिलदार स्वभावाचे अनेक किस्से आजवर ऐकले आहेत. अभिनेते विद्याधर जोशी यांनी रितेशचा एक किस्सा सांगितला.
1/7
हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या विद्याधर जोशींसाठी रितेशनं थिएटर हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. इतकंच नाही तर डॉक्टरांना त्यांची विशेष काळजी घेण्यास सांगितलं होतं.

advertisement
2/7
विद्याधर जोशी आणि रितेश देशमुख यांनी 'वेड' सिनेमात एकत्र काम केलं. त्यानंतर आजारी पडले. त्यांच्या फुफ्फुसांशी संबंधित आजार झाला होता. त्यांचं फुफ्फुस 85 टक्के रिकामी झालं होतं. या दरम्यान रितेशनं त्यांची काळजी घेतली होती.

3/7
अमोल परचुरेंच्या मुलाखतीत बोलताना विद्याधर जोशींनी सांगितलं,
अमोल परचुरेंच्या मुलाखतीत बोलताना विद्याधर जोशींनी सांगितलं, "रितेश देशमुखबरोबर मी खूप काम केलं नाही. फक्त वेडमध्येच फक्त काम केलं. त्यातही मी सात-आठ दिवस होतो. तो दिग्दर्शक असल्यामुळे आणि तो माझा जावई असल्यामुळे आमचा संबंध सतत होता."
advertisement
4/7
 "माझ्या आजारपणाच्या वेळात मी रिलायन्सला अॅडमीट झालो हे त्याला कळलं. ते कसं कळलं हे मला माहिती नाही. त्याने स्वत: डॉक्टरांना फोन केला. तो स्वत: डॉक्टरांना भेटायला आला आणि त्याने सांगितलं की अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे हा माझ्याकरता, त्याच्यासाठी जे काही आहे ते करा, त्याची नीट काळजी घ्या. जातीने तो तिथे आला. माझ्या बायकोशी तो संपर्क ठेवून होता. "

5/7
 "रिलायन्सचा इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये तुम्हाला स्वत:चा मोबाईलसुद्ध घेऊन जाता येत नाही. तुम्हाला हवा असेल तर ते त्यांचा मोबाईल देतात त्यावरून तुम्ही फोन करू शकता. ते त्यांचा टॅब देतात. टीव्ही देतात सगळं देतात. पण तुमचे काही इन्स्ट्रूमेन्ट तुम्ही आत नेऊ शकत नाही."

6/7
 "त्यावेळेस रितेशने डॉक्टरांची खास परवानगी काढून त्याने वेड सिनेमा मला आतमध्ये दाखवला."

7/7
 "मला इतकं आश्चर्य वाटतं की, इतका चांगुलपणा... आमचा पहिला सिनेमा, शॉटपुरते आम्ही एकत्र असायचो. नंतर गप्पा वगैरे मारतोय असं काही नव्हतं. पण असं सगळं असताना तो स्वत: येतो, मला सिनेमा दाखवण्याची तसदी घेतो, एवढे कष्ट घेतो, त्याला हॅट्स ऑफ."

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement