Mrunal Thakur : बॉलिवूड स्टार्सनाही मराठी मालिकांची भुरळ! मृणाल ठाकूर आईसोबत पाहतेय 'ही' सीरियल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mrinal Thakur Watches Marathi Serial : मृणालचं मराठी भाषेवर प्रेम आहेच. ती उत्तम मराठीही बोलते हे सर्वांना माहिती आहे. पण या व्हिडीओमुळे मृणालचं मराठी मालिकांवर असलेलं प्रेमही पाहायला मिळालंय
मुंबई : बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. मृणालने नुकताच एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या आईसोबत घरी बसून मराठी मालिका पाहताना दिसते. मृणालचं मराठी भाषेवर प्रेम आहेच. ती उत्तम मराठीही बोलते हे सर्वांना माहिती आहे. पण या व्हिडीओमुळे मृणालचं मराठी मालिकांवर असलेलं प्रेमही पाहायला मिळालंय
आईसोबत मराठी मालिकेचा आनंद
मृणाल ठाकूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती सोफ्यावर बसली आहे. तिची आई तिच्या केसांची तेलानं चंपी करत आहेत. आई केसांना तेल लावून तिच्या दोन वेण्या घालत घालत टीव्हीवर लागलेली मराठी मालिका पाहतेय. मृणालने आईबरोबरचा तो व्हिडीओ पोस्ट केला.
advertisement
व्हिडीओमध्ये मृणाल म्हणते, "मराठी मालिका, तेल, आईच्या हातची केसांची चंपी आणि दोन वेण्या... माझ्या आईची आवडती मालिका... रविवारचं काम!" व्हिडिओमध्ये दिसतं की मृणाल आणि तिची आई झी मराठीवरील तुला जपणार आहे ही मालिका पाहत आहेत. आई जरी मालिका पाहत असली तरी मृणाललाही मराठी मालिकांची क्रेझ आहे हे या व्हिडीओमधून दिसून आलं. कारण मालिका सुरू असताना मध्येच मृणालही त्यातले काही डायलॉग म्हणत मिमिक्री करताना दिसतेय.
advertisement
चाहत्यांचा आनंद दुप्पट
मृणालचं मराठी मालिकांवरचं प्रेम आणि अनेक दिवसांनी तिच्या तोंडून शुद्ध मराठी ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या एका चाहत्यानं लिहिलंय, "ती किती साधी, घराशी जोडलेली आहे". आणखी एकाने लिहिलंय, "बॉलिवूडमध्ये काम करत असूनही मृणाल अजूनही आपल्या मराठी संस्कृतीशी नातं टिकवून आहे."
advertisement
मराठीशी जोडलेली अभिनेत्री
मृणाल ठाकूरबद्दल सांगायचं झाल्यास ती मूळची धुळ्याच्या मराठी कुटुंबातील मुलगी आहे. तिने आई हिंदी आणि त्यानंतर काही साऊथ सिनेमात काम केलं. तिला साऊथमध्ये सर्वात पंसती मिळाली. मृणालने काही मराठी सिनेमांतही काम केलं आहे. तिने काही मराठी गाण्यांवर डान्स केला आहे. 'सीतारामम', 'जर्सी', 'बाटला हाऊस', 'द फॅमिली स्टार', 'सन ऑफ सरदार 2' सारख्या सिनेमांमध्ये ती दिसली आहे.
advertisement
दरम्यान बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री असूनही मृणाल ठाकूरचा हा साधा आणि घरगुती अंदाज चाहत्यांना आवडला आहे. मराठी मालिकेची क्रेझ फक्त सामान्य प्रेक्षकांपुरती नाही, तर आता ती बॉलिवूड स्टार्सनाही भुरळ घालतेय, हे या व्हिडिओतून स्पष्ट होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 14, 2025 8:25 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mrunal Thakur : बॉलिवूड स्टार्सनाही मराठी मालिकांची भुरळ! मृणाल ठाकूर आईसोबत पाहतेय 'ही' सीरियल