'राज ठाकरेंच्या आवाजात दम पण...' TV जाहिरातींवरुन सुप्रिया सुळेंकडे तक्रार करणाऱ्या पुणेकर आजी स्पष्टच बोलल्या
- Published by:Minal Gurav
Last Updated:
खासदार सुप्रीया सुळे यांच्याकडे मालिकांमधील जाहिराती कमी करा अशी मागणी करणाऱ्या पुणेकर आजी आता राज ठाकरेंबद्दल स्पष्टच बोलल्या.
मुंबई : टीव्ही सीरियल कमी आणि जाहिरातीच जास्त असतात, सीरियलमधल्या जाहिराती कमी करा अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळेंकडे गेलेल्या आजी आठवतायत. आजींचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आजींची तक्रार ऐकून सुप्रीया सुळेंना देखील हसू आवरलं नव्हतं. दरम्यान याच आजी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत स्पष्टच बोलल्यात.
कुसुम घोडके असं त्या आजींचं नाव आहे. त्या 80 वर्षांच्या आहेत. एबीपी माझाशी बोलताना आजींनी पुन्हा एकदा जाहिरातींवरुन आपलं मत मांडलं. त्या म्हणाल्या, "दिवस रिकामा जातो म्हातारपणी करायचं काय? तर मालिका बघायच्या. या मालिकांच्या ब्रेकमध्ये जाहिरात दाखवतात. मग त्या जाहिराती का बघायच्या? त्यावर काय तो तोडगा काढा."
( Hemant Dhome : 'नाहक बळी जात राहणार...' 4 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत )
advertisement
आजी पुढे म्हणाल्या, "मालिकांमध्ये हेवे दावे दाखवतात ते आधी बंद करा. कुरघोडी करणारे व्हिलनही दाखवतात ते सुद्धा बंद करा. असं म्हणत आजींनी मालिकांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना खडसावलं."
आजींना त्यांचा आवडता राजकारणी कोण असं विचारलं असता त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचं नाव घेतलं. त्यानंतर राज ठाकरेंचं नाव घेत त्या म्हणाल्या, "राज ठाकरेंच्या आवाजात दम आहे पण त्यांच्या पाठिशी कोणी नसतं."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'राज ठाकरेंच्या आवाजात दम पण...' TV जाहिरातींवरुन सुप्रिया सुळेंकडे तक्रार करणाऱ्या पुणेकर आजी स्पष्टच बोलल्या