Tata Motorsसाठी ऐतिहासिक दिवस, गुंतवणूकदारांना मिळणार नवे शेअर्स तेही अगदी फुकटात; काय करावे, काय नाही?

Last Updated:

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या ऐतिहासिक डिमर्जरपूर्वी गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवार हा शेवटचा ट्रेडिंग दिवस ठरला असून आता प्रत्येक गुंतवणूकदाराला 1:1 या प्रमाणात नव्या कंपनीचे शेअर्स मिळणार आहेत.

News18
News18
मुंबई: सोमवार 13 ऑक्टोबर 2025 हा दिवस टाटा मोटर्ससाठी एक ऐतिहासिक ठरला. या दिवशी कंपनीचा शेअर थोडा घसरला, पण त्याचवेळी ही घसरण एका नव्या टप्प्याची सुरुवात घेऊन आली. डिमर्जरपूर्वीचा शेवटचा ट्रेडिंग दिवस म्हणून. टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल्स (CV) व्यवसायाच्या विभाजनासाठी म्हणजेच डिमर्जरसाठीरेकॉर्ड डेट’ निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
ज्यांच्या डिमॅट खात्यात सोमवारच्या (13 ऑक्टोबर) क्लोजिंगपर्यंत टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत, त्यांना 1:1 या प्रमाणात नव्या कंपनीचे शेअर्स दिले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक एका टाटा मोटर्स शेअरवर गुंतवणूकदाराला नव्या डिमर्ज झालेल्या कंपनीचा एक शेअर मिळेल. जाणून घेऊयात ही सगळी प्रक्रिया कशी चालते.
advertisement
डिमर्जरची शेवटची तयारी
भारताची अग्रगण्य वाहननिर्मिती कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडचा डिमर्जर आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचा शेअर 2.20% नी घसरून 664 वर बंद झाला. कारण हा दिवस होता, जेव्हा कंपनी शेवटच्या वेळेस ‘कन्सॉलिडेटेड एंटिटी’ म्हणून बाजारात ट्रेड झाली.
advertisement
कंपनीने शेअर बाजारात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 14 ऑक्टोबर (मंगळवार) हा डिमर्जरचा रेकॉर्ड डेट ठरवण्यात आला आहे. म्हणजे ज्यांच्या खात्यात सोमवारपर्यंत शेअर्स आहेत, त्यांनाच नव्या कंपनीचे शेअर्स मिळणार आहेत. दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सचे फेस व्हॅल्यू 2 असेल.
advertisement
दोन स्वतंत्र कंपन्या  
डिमर्जरनंतर टाटा मोटर्स दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागली जाईल:
Tata Motors Passenger Vehicles Ltd. (TMPVL) ही सध्याची लिस्टेड कंपनीच राहील आणि ती प्रवासी वाहन (Passenger Vehicles) तसेच Jaguar Land Rover (JLR) व्यवसाय सांभाळेल.
advertisement
Tata Motors Ltd. Commercial Vehicles ही नवीन डिमर्ज झालेली कंपनी असेल, जी फक्त कमर्शियल व्हेईकल सेगमेंटवर लक्ष केंद्रित करेल.
कंपनीचा उद्देश या पावलामागे स्पष्ट आहे. व्यवसायावर अधिक फोकस, कार्यक्षमतेत वाढ आणि स्वतंत्र निधी उभारणीची संधी.
advertisement
शेअरच्या किमतीत कसा होईल बदल?
रेकॉर्ड डेटनंतर स्टॉक एक्सचेंजवरील ‘प्राइस डिस्कव्हरी मेकॅनिझम’ ठरवेल की डिमर्जरनंतर टाटा मोटर्सच्या विद्यमान शेअरची नवी किंमत किती असेल. कारण त्यातून कमर्शियल व्हेईकल व्यवसायाची किंमत वजा केली जाईल.
यामुळे थोड्या काळासाठी शेअरच्या किमतीत चढ-उतार दिसू शकतात. नवीन कमर्शियल व्हेईकल कंपनीचे शेअर्स साधारणतः 45 ते 60 दिवसांच्या आत बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) होऊन ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील.
डिमर्जरचा प्रवास आणि अडचणी
टाटा मोटर्सने 2023 मध्ये या डिमर्जरची घोषणा केली होती. आता सर्व नियामक (रेग्युलेटरी) मंजुरी मिळाल्यानंतर हा उपक्रम 1 ऑक्टोबर 2025 पासून प्रभावी झाला आहे. या प्रक्रियेदरम्यान नवीन कंपनीचे शेअर्स अधिकृतपणे लिस्ट होईपर्यंत मूळ स्टॉक तात्पुरता ट्रेडिंगसाठी उपलब्ध राहणार नाही.
मात्र या सकारात्मक घटनांच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या लक्झरी युनिट Jaguar Land Rover (JLR) ला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच झालेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्यामुळे कंपनीला £2 अब्जांहून अधिक नुकसान झाले आहे. जे FY25 मध्ये JLR च्या एकूण नफ्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सुमारे 5% घसरण दिसून आली आहे.
तज्ज्ञांचे मत- दीर्घकालीन फायदा संभव
-मार्केट एक्स्पर्ट्सच्या मते, या डिमर्जरमुळे दोन्ही कंपन्यांची खरी किंमत (Value) बाजारात उघड होईल.
-कमर्शियल व्हेईकल युनिट आता स्वतःच्या निधी उभारणीवर आणि स्ट्रॅटेजीवर लक्ष देऊ शकेल.
-तर TMPVL म्हणजे प्रवासी वाहन विभाग, इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EV) आणि JLRच्या रिकव्हरीवर फोकस करेल.
-थोड्या काळासाठी शेअरच्या किंमतीत काही बदल होऊ शकतात.परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा डिमर्जर एक मोठी ‘वॅल्यू क्रिएशन’ची संधी ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Tata Motorsसाठी ऐतिहासिक दिवस, गुंतवणूकदारांना मिळणार नवे शेअर्स तेही अगदी फुकटात; काय करावे, काय नाही?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement