Cheque : बँकेच्या चेकवर 'Lakh' लिहायचं की 'Lac'? माहित नसेल तर RBI चा नियम लगेच जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सर्वसाधारणपणे रक्कम इंग्रजीत लिहिली जाते आणि तेव्हा “लाख” लिहिण्याच्या दोन पद्धती वापरल्या जातात. काही लोक “Lakh” लिहितात, तर काही “Lac”. यामुळे बरेचदा प्रश्न पडतो की, नेमके कोणते शब्दलेखन बरोबर आहे आणि चुकीचं लिहिलं तर चेक रद्द होईल का?
बँक या आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहेत. कोणताही पैशांशी संबंधीत व्यवहार असोत किंवा मग बचत तो बँकेशिवाय अपूर्णच आहे. आता बँकेशी संबंधीत बहुतांश काम हे ऑनलाइन होतात, त्यामुळे लोक फार कमी वेळा बँकेत जातात. पण असं असलं तरी देखील बँकेशी संबंधीत चेकचा वापर आजही लोक करतात. कारण हा व्यवहार जास्त सोयीचा आणि सेफ मानला जातो.
advertisement
तुम्ही कधी ना कधी कोणाला तरी चेक दिला असेल किंवा स्वीकारला असेल. त्यावेळी तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली अशील की चेकवर संख्यांसोबत अक्षरात देखील रक्कम लिहिली जाते. अशात अनेक लोक ते इंग्रजीत लिहितात.
advertisement
advertisement
सर्वसाधारणपणे रक्कम इंग्रजीत लिहिली जाते आणि तेव्हा “लाख” लिहिण्याच्या दोन पद्धती वापरल्या जातात. काही लोक “Lakh” लिहितात, तर काही “Lac”. यामुळे बरेचदा प्रश्न पडतो की, नेमके कोणते शब्दलेखन बरोबर आहे आणि चुकीचं लिहिलं तर चेक रद्द होईल का?
advertisement
शब्दकोशानुसार अर्थ आणि फरकइंग्रजी शब्दकोशात “Lakh” या शब्दाचा अर्थ संख्येसाठी वापरला जातो. म्हणजेच 1,00,000 या आकड्यासाठी “Lakh” हे योग्य स्पेलिंग आहे. तर “Lac” या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. तो काही कीटकांपासून मिळणाऱ्या चिकट पदार्थासाठी वापरला जातो, ज्याचा उपयोग वार्निश, पेंट आणि सीलिंग वॅक्स तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता “Lakh” हेच योग्य शब्दलेखन मानले जाते.
advertisement
आरबीआयचे मार्गदर्शन आणि बँकांचे नियमभारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्वसामान्य ग्राहकांसाठी “Lakh” किंवा “Lac” याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. मात्र बँकिंग क्षेत्रासाठी दिलेल्या मास्टर सर्क्युलरमध्ये इंग्रजीत एक लाख लिहिताना “Lakh” हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अधिकृत कागदपत्रांमध्ये आणि बँकिंग भाषेत “Lakh” हेच मान्य आणि योग्य मानले जाते. रिझर्व्ह बँकेच्या नोटांवर तसेच तिच्या अधिकृत संकेतस्थळावरसुद्धा “Lakh” याचाच वापर दिसून येतो.
advertisement
चुकीच्या शब्दलेखनामुळे चेक रद्द होईल का?यात लोकांना पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर आपण “Lac” असे लिहिले तर चेक अमान्य ठरेल का? प्रत्यक्षात तसे होत नाही. भारतात दोन्ही शब्द बोलचालीत वापरले जातात आणि रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांसाठी कोणतेही बंधनकारक नियम घातलेले नाहीत. त्यामुळे बँका शब्दलेखनावर फारसा भर देत नाहीत. त्यामुळे “Lakh” किंवा “Lac” पैकी कोणतेही शब्दलेखन वापरले तरी चेक वैध राहतो.
advertisement
थोडक्यात सांगायचे झाले तर, बँकिंगच्या दृष्टीने आणि अधिकृत व्यवहारांसाठी “Lakh” हेच योग्य आणि शिफारस केलेले शब्दलेखन आहे. मात्र व्यवहाराच्या दृष्टीने दोन्ही शब्द वापरले तरी चेक अमान्य ठरत नाही. म्हणून पुढच्या वेळी चेक लिहिताना “Lakh” वापरणे हे अधिक शास्त्रीय आणि योग्य ठरेल, पण “Lac” लिहिल्याने तुमचा चेक नाकारला जाणार नाही.